शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे रेल्वे स्थानकावर मोबाईल चार्जिंगला लावा, बिनधास्त फिरा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 20:33 IST

फक्त ही सुविधा मोफत नसेल.. त्यासाठी तुम्हाला काही चार्जेस असतील

ठळक मुद्दे मध्य रेल्वेने काही प्रमुख स्थानकांवर मोबाईल चार्जिंग मशिन बसविण्याचा घेतला निर्णयकोल्हापूर, मिरज, शिवाजीनगर, पिंपरी व चिंचवड स्थानकांवरही लवकरच ही सुविधाएकावेळी २४ मोबाईल चार्जिंगला लावता येऊ शकणार

पुणे : तुम्ही रेल्वे स्थानकावर असाल आणि मोबाईल बॅटरीची चार्जिंग कमी झाली असेल तर काळजी करू नका. आता रेल्वे स्थानकांवर मोबाईल चार्जिंग मशिन (किओस्क) बसविण्यात आली आहेत. तुम्ही दहा रुपयांत या मशिनच्या लॉकरमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी ठेऊन कुठेही बिनधास्त फिरू शकतात. तुमचा मोबाईल लॉकरमध्ये सुरक्षित राहील. ही सुविधा पुणे रेल्वे स्थानकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वेने लांबपल्याच्या प्रवासासाठी अनेक प्रवासी करमणुकीसाठी मोबाईलचा वापर करतात. काहीवेळा स्थानकावर आल्यानंतर मोबाईल बॅटरीचे चार्जिंग झालेले नसते. तर काहीवेळा रेल्वेला विलंब झाल्याने काही तास स्थानकावरच घालवावे लागतात. तिथे चार्जिंगची सुविधा उपलब्ध नसते. यापार्श्वभुमीवर मध्य रेल्वेने काही प्रमुख स्थानकांवर मोबाईल चार्जिंग मशिन बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे रेल्वे स्थानकावर या मशिन बसविण्यास सुरूवात झाली आहे. एकुण १० मशिन सर्व फलांटावर बसविण्यात येणार आहेत. तसेच कोल्हापूर, मिरज, शिवाजीनगर, पिंपरी व चिंचवड स्थानकांवरही लवकरच ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रत्येक मशिनमध्ये २४ चार्जिंग पॉईंट आहेत. यामुळे एकावेळी २४ मोबाईल चार्जिंगला लावता येऊ शकतात. प्रत्येक मशिनला लॉकरची सुविधा असून त्यासाठी स्वयंचलित प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. प्रति तास दहा रुपये याप्रमाणे प्रवाशांना मोबाईल चार्जिंग करता येईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. -----------असे करता येईल चार्जिंगमोबाईल चार्जिंग मशिन एटीएमप्रमाणे काम करेल. मशिनमध्ये एक तासासाठी दहा रुपये टाकल्यानंतर बारकोडसह एक छापील स्लिप बाहेर येईल. त्यानंतर लगेच एक लॉकर उघडले जाईल. या लॉकरमध्ये प्रवाशाला मोबाईल चार्जिंगला ठेवावा लागेल. लॉकरचा दरवाजा बंद केल्यानंतर तो स्लीपवर आलेल्या कोड शिवाय उघडणार नाही. त्यामुळे छापील स्लीप प्रवाशांना जपून ठेवावी लागेल. मोबाईल चार्जिंगला लावून प्रवासी कुठेही जाऊ शकतात. स्लीपवरील कोड मशिनच्या स्क्रीनवरील स्कॅनरवर ठेवल्यानंतर लॉकरचा दरवाजा उघडेल. मोबाईल काढल्यानंतर दरवाजा पुन्हा बंद होईल.  

टॅग्स :Puneपुणेpune railway stationपुणे रेल्वे स्थानकCentral Governmentकेंद्र सरकारMobileमोबाइलpassengerप्रवासी