शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोंढव्यात पोलीस निरीक्षकांच्या बदली निषेधार्थ मनसेचा मूक मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 20:12 IST

कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मिलिंद गायकवाड यांची बदली आमदार योगेश टिळेकर व इतरावर खंडणीचा गुन्हा दाखल केल्यावर अचानकपणे कशासाठी करण्यात आली.

ठळक मुद्देमिलिंद गायकवाड यांना निरोप देताना नागरिक व पोलीस कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर कोंढवा पोलिस स्टेशनचे गुन्हे पोलीस निरीक्षकांना निवेदन

कोंढवा : कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची झालेली तडकाफडकी बदलीच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोंढवा बुद्रुक येथील माता रमाबाई आंबेडकर अग्निशामक केंद्र ते कोंढवा पोलिस स्टेशनपर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. गायकवाड यांना निरोप देतानाचा काही नागरिकांना व पोलीस कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.मिलिंद गायकवाड यांची बदली आमदार योगेश टिळेकर व इतरावर खंडणीचा गुन्हा दाखल केल्यावर अचानकपणे कशासाठी करण्यात आली. मिलिंद गायकवाड यांची झालेली बदली सर्वसामान्य बदल्यांचा भाग आहे की यामागे कोणी दबाव टाकला याची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच त्यांची बदली रद्द करावी यांसारख्या मागणीचे निवेदन पुणे महानगर पालिकेतील मनसेचे गटनेते व नगरसेवक वसंत मोरे यांनी कोंढवा पोलिस स्टेशनचे गुन्हे पोलीस निरीक्षकांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.  मनसे नगरसेवक साईनाथ बाबर म्हणाले. हडपसर विधानसभा मतदार संघ भयमुक्त झाला पाहिजे. उत्तम कार्य करणारे पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची झालेली बदली त्वरित रद्द करावी अन्यथा उग्र आंदोलन केले जाईल व ज्याच्या परिणामाला हे बुरे दिनवाले सरकार जबाबदार राहील. मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे यांनी सुद्धा गायकवाड यांची बदली रद्द करून पोलीस दलाचे मनोधर्य उंचवावे अशी मागणी यावेळी केली.  कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी मिलिंद गायकवाड यांनी जवळपास आमदार योगेश टिळेकर यांच्याविरोधात आलेल्या तक्रारीची शहानिशा करून टिळेकर व इतरावर यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. यानंतर गायकवाड व पोलिस दलावर विविध खालच्या पातळीवरचे आरोप फेसबुक व इतर सोशल मीडियावर केले गेले. यामुळे प्रामणिकपणे आपले कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांचे मनोधर्य खच्ची होत आहे. जर हाच पायंडा पडला तर यापुढे अशा स्वरूपाचे गुन्हे यापुढे दाखल करून घेतले जाणार नाही व आरोपी मोकाट फिरत राहतील अशी भीती मोरे यांनी यावेळी व्यक्त केली. दिवाळीच्या अगोदर  आमदार योगेश टिळेकर यांचे अजून काही गैरव्यवहार आपण पुराव्याांनिशी जगजाहीर करणार असल्याचे नगरसेवक वसंत मोरे यांनी यावेळी सांगितले.यावेळी मनसे महाराष्ट्र सरचिटणीस हेमंत संभूस, मनसे पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे, माजी नगरसेविका आरती बाबर, रुपाली ठोंबरे, मनसे विदयार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष साबळे पाटील, प्रशांत कनोजिया, अमोल शिरस, सतीश शिंदे, मंगेश रासकर, विलास कामठे, इतर पक्षातील कार्यकर्ते, महिला व नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :KondhvaकोंढवाPoliceपोलिसTransferबदलीMNSमनसे