शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचा पत्रीपुलावर ठिय्या, जोरदार घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 02:45 IST

कल्याण शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न कायम असताना कल्याण जुना पत्रीपूल पाडण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. कोंडीच्या निषेधार्थ मनसेने शनिवारी पुलावर ठिय्या दिला.

कल्याण  - शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न कायम असताना कल्याण जुना पत्रीपूल पाडण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. कोंडीच्या निषेधार्थ मनसेने शनिवारी पुलावर ठिय्या दिला. यावेळी केडीएमसी, रेल्वे प्रशासन आणि एमएसआरडीसी यांच्याविरोधात काळे कपडे परिधान करून जोरदार घोषणाबाजी केली.मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, माजी आ. प्रकाश भोईर, मनोज घरत, कौस्तुभ देसाई, उल्हास भोईर, प्रकाश भोईर, राहुल कामत, सागर जेधे, कस्तुरी देसाई, मंदा पाटील, दीपिका पेडणेकर, ऊर्मिला तांबे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.जुना पत्रीपूल धोकादायक झाल्याने तो पाडण्याचा निर्णय रेल्वे व एमएसआरडीसीने घेतला आहे. २५ सप्टेंबरपासून पूल पाडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे नवा पूल लवकर होणे दुरापास्त आहे. कल्याण-शीळ मार्गाचा प्रवास हा पाच तासांचा झाला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके आल्याशिवाय ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. त्यामुळे बोडके आंदोलनस्थळी आले.जुना पत्रीपूल पाडण्याचे काम एमएसआरडीसी व रेल्वेकडून सुरू आहे. मात्र, रेल्वेकडून काही तांत्रिक बाबींची पूर्तता होणे बाकी आहे. आयआयटीकडून काही अहवाल मागवले आहेत. ते आल्यावर त्यांच्याकडून हे काम केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.जुन्या पुलावरील वाहतूक शेजारील अरुंद पुलावरून वाहतूक वळवली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्याचा अंदाज अगोदरच संबंधित यंत्रणांनी घ्यायला हवा होता. युद्धपातळीवर काम करून तीन महिन्यांत नवा पूल आम्ही उभारू, असे आश्वासन देणारे अधिकारी आता तांत्रिक अडचणी पुढे करून १२ महिन्यांची मुदत मागत आहेत. पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने आज आम्ही ठिय्या दिला. पण, पुढे तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा मनसेचे डोंबिवली शहर संघटक व परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी दिला.तर काम होणार सुरूच्एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय अधिकारी राम जैस्वार हेदेखील आंदोलनस्थळी आले.च्ते म्हणाले, ‘नागरिकांना त्रास होत आहे, ही गोष्ट मान्य आहे. नव्या पत्रीपुलाचे डिझाइन आयआयटीकडे पाठवले आहे. त्याला मान्यता मिळताच पुलाचे काम सुरू होईल.’

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याणMNSमनसे