मनसेला अजूनही सापडेना विरोधकाचा सूर

By Admin | Updated: June 18, 2015 00:13 IST2015-06-18T00:13:59+5:302015-06-18T00:13:59+5:30

महापालिकेच्या कारभारातील चार वर्षे संपत आली, तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नगरसेवकांना विरोधकाच्या भूमिकेचा सूर सापडलेला नाही.

MNS still finds the tone of opposition | मनसेला अजूनही सापडेना विरोधकाचा सूर

मनसेला अजूनही सापडेना विरोधकाचा सूर

पुणे : महापालिकेच्या कारभारातील चार वर्षे संपत आली, तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नगरसेवकांना विरोधकाच्या भूमिकेचा सूर सापडलेला नाही. त्याविषयी राज ठाकरे यांनी मुंबर्ईत नुकत्याच झालेल्या बैठकीत नगरसेवकांना धारेवर धरले. आता तरी विरोधकांची भूमिका बजावा; अन्यथा पुणेकरांना आगामी निवडणुकीत काय उत्तर देणार, असा सवाल केला.
महापालिकेतील २०१२च्या निवडणुकीत राष्ट्रवादीनंतरचे संख्याबळ असलेला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून मनसेला संधी मिळाली. मात्र, पुणेकरांनी विरोधकांची भूमिका बजाविण्यासाठी टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यात मनसेच्या नगरसेवकांना अद्याप यश आलेले नाही. महापालिकेतील विविध विषयांवरून भूमिका बदलत गेल्या. कधी राष्ट्रवादी-काँग्रेस, तर कधी युतीला पाठिंबा दिला.
महापालिकेच्या स्थायी, विषय समिती व प्रभाग समिती निवडणुकीतही राष्ट्रवादीला थेट पाठिंबा देऊन मनसेच्या नगरसेवकांनी विविध पदे पदरात पाडून घेतली. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत काही वरिष्ठ नगरसेवकांनी पक्षातील इतर नगरसेवक व नगरसेविकांना विश्वासात घेतले नाही. केवळ मुंबईवरून आदेश असल्याचे सांगून ऐनवेळी सभागृहात व समितीमध्ये भूमिका घ्यावी लागते. महापालिकेच्या अर्थसंकल्पातही सात ते आठ वरिष्ठ नगरसेवक जादा निधी आपल्या पदरात पाडून घेतात. मात्र, इतर सहकारी नगरसेवकांकडे दुर्लक्ष केले जाते, अशा तक्रारीचा पाढा नगरसेवकांनी राज ठाकरे यांच्या पुढे वाचून दाखविला. त्या वेळी राज ठाकरे यांनी मनसे गटनेत्यांसह काही वरिष्ठ पदाधिकारी व नगरसेवकांचा समाचार घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: MNS still finds the tone of opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.