दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करण्याला मनसेचा आक्षेप
By Admin | Updated: January 24, 2017 02:46 IST2017-01-24T02:46:41+5:302017-01-24T02:46:41+5:30
उमेदवारी अर्ज आॅनलाइन सादर करायचा हे ठीक आहे; मात्र पुन्हा त्याची प्रतही सादर करायची, या प्रकारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप

दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करण्याला मनसेचा आक्षेप
पुणे : उमेदवारी अर्ज आॅनलाइन सादर करायचा हे ठीक आहे; मात्र पुन्हा त्याची प्रतही सादर करायची, या प्रकारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. आॅनलाइन अर्ज करणे सक्तीचे केले आहे; पण एखादा उमेदवार संगणक निरक्षर असेल तर त्याने काय करायचे, असाही मुद्दा मनसेने उपस्थित केला आहे. संगणक निरक्षर उमेदवाराला आॅनलाइन अर्जासाठी सहायकाची मदत घ्यावी लागणार. या सहायकाकडून नकळत किंवा हेतुपुरस्पर चूक झाली तर त्याची जबाबदारी कोणावर? निवडणूक अर्ज भरण्याच्या काळात इंटरनेटमध्ये बिघाड किंवा इतर तांत्रिक बाबींमुळे उशीर झाला तर? सर्वर डाऊन झाला तर काय करायचे?
बी. फॉर्म उमेदवाराने अपलोड करायचा आहे तो अपलोड झाला नाही तर? असे प्रश्न मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस, अजय शिंदे, बाळासाहेब शेडगे यांंनी उपस्थित केले आहेत.आॅनलाइन अर्ज सादर केला, त्याचा संकेतांक मिळाला की पुन्हा त्याच अर्जाची प्रिंट काढून तो अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करायचा, हा अनाकलनीय प्रकार असल्याची टीका त्यांनी
केली आहे. एकतर बदलत्या युगाप्रमाणे तरी वागा किंवा मग पारंपरिक पद्धतच सुरू ठेवा, अशी मागणी मनसेने केली आहे. (प्रतिनिधी)