पुणे : भगवी शाल पांघरूण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खालकर चौकातील मारुती मंदिरात शनिवारी सायंकाळीमारूतीची महाआरती केली. हनुमान जयंतीचा मुहूर्त व राज ठाकरे यांनी ‘तुमचे भोंगे काढा, अन्यथा आम्ही आमची हनुमान चालिसा लावू’ म्हणून दिलेला इशारा या पार्श्वभूमीवर या महाआरतीला अभूतपूर्व गर्दी झाली होती.कार्यकर्त्यांनी दिलेली चांदीची गदा उंचावून ठाकरे यांनी या गर्दीला अभिवादन केले. राज यांनी कृतीतून बरेच काही दाखवून दिले. सहा वाजताची वेळ असताना ते साडेसात वाजता मंदिरात आले. मंदिरात जाऊन राज यांनी मारुतीची सांग्रसंगीत पूजा केली. आरती संपल्यावर लगेचच मंदिराच्या आवारात बसलेल्या सालसर मंडळाने हनुमान चालीसाचे पठण सुरू केले. ते पूर्ण होईपर्यंत राज चौथऱ्यावर उभे होते.
पुण्यात मनसेची हनुमान मंदिरात महाआरती; राज यांचे भगव्या शालीतून समुदायाला अभिवादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 08:52 IST