शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राज ठाकरेंचा 'जबरा' फॅन; आईशी भांडण करत चिमुकल्याने मिळवली लाडक्या नेत्याची 'ऑटोग्राफ' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 16:55 IST

मनसेप्रमुख राज ठाकरे चाहता वर्ग मोठा असून तो सर्व वयोगटात असल्याचे आज पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे.

पुणे : मनसेप्रमुखराज ठाकरे हे रोखठोक स्वभावासाठी ओळखले जाते. तसेच ठाकरे यांचा चाहता वर्ग मोठा असून तो सर्व वयोगटात असल्याचे आज पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. आगामी काळात होणाऱ्या पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी मनसेने कंबर कसली असून राज ठाकरे यांचा पंधरा दिवसांच्या आतच दुसऱ्यांदा पुणे दौऱ्यावर आले आहे. पण याच दौऱ्यावेळी ठाकरे यांच्या भेटीसाठी एका चिमुकल्या 'फॅन'ने चक्क आपल्या आईशी भांडण करत अखेर त्यांची 'ऑटोग्राफ' मिळवलीच. 

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेने जय्यत तयारी सुरु केली आहे. या धर्तीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर आले आहेत. सकाळीच ९.३० च्या सुमारास राज ठाकरे नवी पेठेतील पक्षाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांचा पंधरा दिवसांच्या आत हा दुसरा तीन दिवसांचा दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या बैठका, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद असे अनेक कार्यक्रम ठरले असल्याने त्यांचा दौरा साहजिकच प्रचंड व्यस्त असणार आहे. पण याच भेटीवेळी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

या दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी तिसरीत शिकणाऱ्या सोहम जगताप या चिमुकल्याची धडपड सुरु होती. राज ठाकरे गाडीत बसण्यासाठी जात असताना आईशी भांडण करून तो वही आणि पेन घेऊन राज ठाकरेंच्या दिशेने धावला. त्याने ठाकरे यांच्याकडे ऑटोग्राफची मागणी केली. त्याच्या मागणीला राज यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला.. पण सही कशी करू हा प्रश्न निर्माण झाला असतानाच त्यांनी पुणे शहर मनसेचे अध्यक्ष वसंत मोरे यांच्या पाठीचा आधार घेत आपल्या चिमुकल्या फॅनला ऑटोग्राफ दिला. आपल्या लाडक्या नेत्याची सही मिळाल्यामुळे हा चिमुकला कमालीचा भारावून गेला.राज ठाकरे यांनी त्याच्याशी काही क्षण संवाद साधला व पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. यावेळी उपस्थित सर्वजण अचंबित झाले. 

...अन् राज ठाकरे  मिश्किलपणे म्हणाले, 'मी काय कुंद्रा आहे का?'राज ठाकरे पुण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात दाखल झाल्यानंतर सर्व पत्रकार, कॅमेरामन, फोटोग्राफर्सने त्यांचे फोटोज, व्हिडीओ घेण्यासाठी गर्दी केली होती. बराचवेळ फोटोग्राफर फोटोज क्लिक करत होते, हे पाहून राज ठाकरेंनी मिश्किल टिप्पणी केली. फोटोग्राफर्सकडे पाहून राज ठाकरेंनी हसत म्हटलं, सर्व आलं का कान.. नाक? किती वेळा तेच तेच, असं म्हणत 'मी काय कुंद्रा आहे का?', असं  मिश्किल भाष्य राज ठाकरे यांनी केलं.

राज ठाकरे यांचा पुण्यात तीन दिवस मुक्‍काम पुणे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे नाशिक मुंबईकडे लक्ष देणार आहे. राज ठाकरे यांनी नुकताच पुण्यात तीन दिवस मुक्‍काम करून सर्व मतदारसंघातील पदाधिकारी, माजी नगरसेवक, प्रभागप्रमुख आदींशी चर्चा केली. त्यानुसार २८ ते ३० जुलै असा तीन दिवसीय दौरा निश्‍चित करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत कसबा, पर्वती आणि हडपसर या मतदारसंघाच्या मुलाखती होणार आहेत. गुरुवारी शिवाजीनगर, कोथरूड आणि कँटोन्मेंट मतदारसंघाच्या व शुक्रवारी खडकवासला, वडगावशेरी मतदारसंघाच्या मुलाखती होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेPoliticsराजकारण