शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मनसे 'अ‍ॅक्शन' मोडमध्ये; बारामतीत ठरली रणनीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 11:54 IST

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याच्या घोषणेमुळे सर्व मनसे नेते, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष हे वेगाने तयारीला लागले आहे.

बारामती : महाराष्ट्र नवनिर्माण सेने हा फक्त मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरात अस्तित्वात आहे, अशी टीका नेहमी केली जाते. परंतू, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुका मनसे लढवेल अशी घोषणा केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच मनसे जर गाव पातळीवरच्या निवडणुकीत ताकदीनिशी उतरली तर याचा फटका नेमका महाविकास आघाडीला बसणार की भाजपला हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे. 

राज ठाकरे यांच्या ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याच्या घोषणेमुळे सर्व मनसे नेते, जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष हे वेगाने तयारीला राहिले आहे. कार्यकर्त्यांच्या बैठका सुरु झाल्या आहेत. सध्या रिव्हर्स मोडवर असलेले मनसे इंजिन ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नशीब आजमावत पुन्हा एकदा रुळावर येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. म्हणून मनसेने आपला मोर्चा गाव पातळीवर वळविला आहे. 

पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी पक्ष प्रमुख ठाकरे यांच्या आदेशानुसार शुक्रवारी (दि १८)  बारामतीमध्ये चार तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मनसेचे नेते राजेंद्र वागसकर यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला. मनसे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. सुधीर पाटसकर यावेळी उपस्थित होते.काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मनसे पॅनल उभे करणार आहे. जिथे शक्य नाही तिथे युती करून निवडणूक लढणार असल्याचा निर्णय आज बारामती मध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी मनसेचे नेते वागस्कर,प्रदेश उपाध्यक्ष पाटसकर, जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. विनोद जावळे मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामीण भागातील तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.  काही ठिकाणी मनसे पॅनल उभा करणार आहे,तर जिथे शक्य नाही तिथे युती करून लढुन ग्रामपंचायतीमध्ये शिरकाव करणार असल्याचे वागसकर यांनी सांगितले. आज झालेल्या बैठकीत बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.आम्ही चार तालुक्यातील ७० टक्के जागा लढविण्यासंदर्भात चर्चा झाली आहे.  यावेळी सर्व जागांवर निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे वागसकर म्हणाले.

टॅग्स :BaramatiबारामतीMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक