शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आमदार पलूसचा तरी पुणे कायम स्मरणात : विश्वजीत कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 21:55 IST

माझा पुण्याशी फारसा संबध नव्हता, मात्र सन २०१४ मध्ये राहूल गांधी यांचा फोन आला.त्या लोकसभा निवडणुकीमुळे पुण्याशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. तसेच त्या पराभवाने कणखर देखील केले.

ठळक मुद्देपुणे शहर काँग्रेसचेच आहे, ते पुन्हा काँग्रेसचे होईलपलूस कडेगाव मधून आमदार झाल्याबद्धल पुणे शहर काँग्रेसच्या वतीने कदम यांचा सत्कार

पुणे : माझा पुण्याशी फारसा संबध नव्हता, मात्र सन २०१४ मध्ये राहूल गांधी यांचा फोन आला व लोकसभेची निवडणूक लढवावी लागली, काही ज्येष्ठांना संधी हवी होती, मात्र मला आदेश पाळावा लागला, त्यावेळी अनेक आरोप झाले व त्यातूनच कणखर होत गेलोे असे प्रतिपादन पलूस कडेगावचे नवनिर्वाचित आमदार विश्वजीत कदम यांनी केलपलूस कडेगाव मधून आमदार झाल्याबद्धल पुणे शहर काँग्रेसच्या वतीने कदम यांचा काँग्रेस भवन येथे सत्कार करण्यात आला. शहराध्यक्ष रमेश बागवे, जिल्हाध्यक्ष संजय जगताप, आमदार शरद रणपिसे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दिप्ती चवधरी, महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक रविंद्र धंगेकर, गोपाळ तिवारी, संगीता तिवारी तसेच काँग्रेसच्या विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.वडील पतंगराव कदम यांचे स्मरण करून विश्वजीत म्हणाले, त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामाची पुण्याईच मला उपयोगी पडली आहे. ते मुख्यमंत्री व्हावेत अशी अनेकांची इच्छा होती. त्यात अडथळे येत गेले पण, ते कधी नाराज झाले नाहीत. त्यांच्याकडून हीच शिकवण मला मिळाली आहे. ती कधीच विसरणार नाही. राजकारणात त्यांच्यासारखेच वागेल व काम करेल.पुणेकरांनी फार प्रेम दिले. त्यांना वाटले विश्वजीत कशाला पुण्याकडे लक्ष देईल, मात्र तसे नाही. पुण्यातील कोणीही माझ्याकडे कधीही आले तरी मी त्याच्या कामासाठी तत्पर राहील असे विश्वजीत यांनी सांगितले. पुणे शहर काँग्रेसचेच आहे, ते पुन्हा काँग्रेसचे होईल, मात्र त्यासाठी युवकांना ताकद दिली पाहिजे, विश्वास दिला पाहिजे. त्यांना संधी दिली तर ते पुणे लोकसभा मतदार संघ पुन्हा खेचून घेतील असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला. यावेळी यावेळी रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, शरद रणपिसे आदींची विश्वजीत यांचा गौरव करणारी भाषणे झाली. सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणात पतंगराव यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

टॅग्स :PuneपुणेVishwajeet Kadamविश्वजीत कदमcongressकाँग्रेसPatangrao Kadamपतंगराव कदम