कोंढापुरी कोविड सेंटरला आमदार पवारांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:11 IST2021-04-11T04:11:25+5:302021-04-11T04:11:25+5:30

यावेळी माजी सरपंच स्वप्निल गायकवाड, कोविड सेंटरच्या व्यवस्थापिका योगिता चौधरी, कॅम्पस डायरेक्टर अनिता माने, ग्रामविकास अधिकारी गंगाधर देशमुख, ...

MLA Pawar's visit to Kondhapuri Kovid Center | कोंढापुरी कोविड सेंटरला आमदार पवारांची भेट

कोंढापुरी कोविड सेंटरला आमदार पवारांची भेट

यावेळी माजी सरपंच स्वप्निल गायकवाड, कोविड सेंटरच्या व्यवस्थापिका योगिता चौधरी, कॅम्पस डायरेक्टर अनिता माने, ग्रामविकास अधिकारी गंगाधर देशमुख, ग्रामपंचायत सदस्य राहुल दिघे, पोलीस पाटील राजेश गायकवाड, उमेश दरवडे, योगेश दिघे, अमोल गायकवाड उपस्थित होते.

येथील कोविड सेंटरबाबत येत असणाऱ्या रुग्णांच्या अडीअडचणी आमदार पवार यांनी समजून घेऊन त्या ताबडतोब सोडविण्याच्या सूचना तालुका आरोग्य प्रशासनाला दिल्या. तसेच उपस्थित आरोग्य अधिकारी व सर्व आरोग्य सेवकांच्या सूचनाच्या सर्व रुग्णांनी पालन करावे इतरही बाजूला असणाऱ्या नागरिकांना व रुग्णांना आपला कोणताही त्रास होऊ नये याबाबत काळजी घेऊन प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन पवार यांनी केले. आमदार पवार यांच्या सूचनेनुसार येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोविड सेंटरला निर्जंतुकीकरण करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराइड, औषध फवारणी पंप, कचराकुंडी सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात आली.

१०रांजणगाव गणपती

कोंढापुरी ता. शिरूर येथील कोविड सेंटरची अशोक पवार यांनी पाहणी करून आरोग्य कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.

Web Title: MLA Pawar's visit to Kondhapuri Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.