आमदार मेधा कुलकर्णी यांची स्वाइन फ्लूवर मात

By Admin | Updated: February 21, 2015 02:58 IST2015-02-21T02:58:41+5:302015-02-21T02:58:41+5:30

कोथरूड मतदारसंघातील भाजपा आमदार मेधा कुलकर्णी यांनी स्वाइन फ्लूशी यशस्वी लढा दिला. चार दिवस खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना शुक्रवारी घरी सोडण्यात आले.

MLA Medha Kulkarni defeats Swine Flu | आमदार मेधा कुलकर्णी यांची स्वाइन फ्लूवर मात

आमदार मेधा कुलकर्णी यांची स्वाइन फ्लूवर मात

पुणे : कोथरूड मतदारसंघातील भाजपा आमदार मेधा कुलकर्णी यांनी स्वाइन फ्लूशी यशस्वी लढा दिला. चार दिवस खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना शुक्रवारी घरी सोडण्यात आले.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रभारी आरोग्यप्रमुख डॉ. एस.टी. परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाइन फ्लूची लक्षणे दिसू लागल्याने कुलकर्णी यांच्या घशातील कफाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या अहवालात त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. औषधोपचारानंतर त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आणि शुक्रवारी त्यांना घरी सोडण्यात आले, असे परदेशी म्हणाले.

Web Title: MLA Medha Kulkarni defeats Swine Flu