आमदार राजीनामा देऊच शकत नाहीत
By Admin | Updated: April 24, 2015 03:34 IST2015-04-24T03:34:32+5:302015-04-24T03:34:32+5:30
सत्तेसाठी इकडून तिकडे पळणारे आमदार लक्ष्मण जगताप अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावरून राजीनामा देऊ शकत नाहीत, असा टोला अनधिकृत बांधकामावरून

आमदार राजीनामा देऊच शकत नाहीत
पिंपरी : सत्तेसाठी इकडून तिकडे पळणारे आमदार लक्ष्मण जगताप अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावरून राजीनामा देऊ शकत नाहीत, असा टोला अनधिकृत बांधकामावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत आमदारांना लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद आज झाली. त्या वेळी ज्येष्ठ नेते पानसरे यांनी जगतापांवर
टीकास्त्र सोडले. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सुटला नाही, तर राजीनामा देण्याची तयारी आमदारांनी दर्शविली होती. हा प्रश्न सुटत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस जगताप यांचा राजीनामा मागणार का? या प्रश्नावर पानसरे म्हणाले, ‘‘जगताप यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळीदेखील अशीच घोषणा केली होती. त्यानंतर पुन्हा एक वीट पडली, तरी मी राजीनामा देईन, अशी घोषणा केली होती. मात्र, सत्तेसाठी इकडून तिकडे जाणारे आमदार राजीनामा देतील, असे वाटत नाही.’’
पानसरे म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीने केलेल्या कामांची प्रसिद्धी पक्षाला करता आली नाही. त्याचा फटका बसला आहे. अनधिकृत बांधकामांच्या बाबतीतही कुंटे
समिती आघाडी सरकारने स्थापन केली होती, असे त्यांनी म्हटले. मात्र, आमचे विरोधी पक्ष काम न करता प्रसिद्धीमध्ये पुढे आहेत. राष्ट्रवादीने अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सुटण्यासाठी मनापासून प्रयत्न केले होते.’’
शहराध्यक्ष निवडीविषयी पानसरे म्हणाले, ‘‘मी या पदासाठी इच्छुक नाही. माजी महापौर संजोग वाघिरे, माजी स्थायी समिती सभापती ज्ञानेश्वर भालेराव, माजी
नगरसेवक नाना काटे, पंडित गवळी हे इच्छुक आहेत. मात्र, निवड ही
पवारच करतील. राष्ट्रवादी निर्धार मेळावा रविवारी चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात दुपारी तीनला होणार आहे.’’
विरोधकांकडून झालेल्या टीकेबाबत सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम म्हणाल्या, ‘‘आंबे
असलेल्या झाडालाच लोक दगड मारणार. यामुळे काम करणाऱ्यांचीच नेहमी चर्चा होते. कोणत्याही
गोष्टीत संबंध नसताना बदनामी राष्ट्रवादीची केली. प्रभाग निवडणुकांवरूनही वाद उठवला गेला. किरण मोटे इच्छुक असतानाही बळजबरीने त्यांना ओढून
आणले, अशी चर्चा केली. ताथवडे डीपी प्रकरणात माझा संबंध
नसताना नाव ओढले जात गेले. वायसीएम खरेदी, बाग-बगिचा वृक्षारोपण आदी गोष्टींमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जातात.’’
या वेळी स्थायी समिती सभापती अतुल शितोळे, महापौर शकुंतला धराडे, पक्षनेत्या मंगला कदम, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, शिक्षण मंडळ सभापती धनंजय भालेकर, विधी समिती सभापती सुजाता पालांडे उपस्थित होते.(प्रतिनिधी)