चुकलेला चिमुकला मितेश विसावला आईच्या कुशीत
By Admin | Updated: March 14, 2017 08:00 IST2017-03-14T08:00:16+5:302017-03-14T08:00:16+5:30
थेरगावातील सोसायटीच्या उद्यानात खेळता-खेळता साडेतीन वर्षांचा चिमुरडा मितेश गर्दी असलेल्या डांगे चौकात पोहोचला

चुकलेला चिमुकला मितेश विसावला आईच्या कुशीत
वाकड : थेरगावातील सोसायटीच्या उद्यानात खेळता-खेळता साडेतीन वर्षांचा चिमुरडा मितेश गर्दी असलेल्या डांगे चौकात पोहोचला. सोसायटीच्या उद्यानातून अचानक गायब झालेल्या मितेशमुळे त्याची आई स्नेहल चिंताग्रस्त झाली. जैन कुटुंबीयांनी मुलाच्या शोधासाठी परिसर धुंडाळला. सर्व प्रयत्न केल्यानंतर एका सजग नागरिकाच्या सतकर्तेमुळे आणि पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे तब्बल दीड तासाने चिमुकला आईच्या कुशीत विसावला.
थेरगावातील ‘कासा ७’ या सोसायटीत दोन वर्षांपूर्वी मुकेश जैन यांचे कुटुंबीय राहाण्यास आले आहेत. मितेशची आई डॉक्टर आहे. वडील मुकेश जैन हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. नोकरीनिमित्त ते पॅरिसला असतात. मितेश हा आई, आजी आजोबा, एक थोरला भाऊ यांच्यासोबत थेरगावात राहतो.
खेळता-खेळता तो उद्यानातील प्रवेशद्वारातून बाहेर पडला. थेट डांगे चौकात पोहोचला. त्यावेळी मुकेश पडघन यांनी त्याला पाहिले.
वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नितीन जगताप, प्रमोद कदम यांनीही त्याला नाव, पत्ता विचारण्याचा प्रयत्न केला. प्रतिसाद न मिळाल्याने त्याला पोलीस
ठाण्यात नेले.(वार्ताहर)