एमआयटी पर्सोना फेस्ट उत्साहात
By Admin | Updated: February 15, 2017 02:31 IST2017-02-15T02:31:00+5:302017-02-15T02:31:00+5:30
एमआयटी कला, डिझाईन तंत्रज्ञान विद्यापीठातर्फे आंतर महाविद्यालयीन एमआयटी - पर्सोना फेस्ट २०१७ या ३ दिवसीय फेस्टिव्हलचे

एमआयटी पर्सोना फेस्ट उत्साहात
पुणे : एमआयटी कला, डिझाईन तंत्रज्ञान विद्यापीठातर्फे आंतर महाविद्यालयीन एमआयटी - पर्सोना फेस्ट २०१७ या ३ दिवसीय फेस्टिव्हलचे लोणी काळभोर येथील राजबागेत आयोजन करण्यात आले होते.
गझलगायक पंकज उदास यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी एमआयटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी ग्रुपचे विश्वस्त आणि सचिव डॉ. मंगेश कराड, पार्श्वगायक हृदय गट्टानी, तपन सिंघल आदी उपस्थित होते.
फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडियासाठी पोस्टर मेकिंगची स्पर्धा घेण्यात आली. तसेच गेम्सची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना काउन्टर स्ट्राईक, एनएफएस, फिफा, बॅटल कोड यांसारख्या प्रसिद्ध गेम्समध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. रिव्हर्स फिल्ममेकिंग स्पर्धा ही विद्यार्थ्यांमधील सर्वोत्तम सर्जनशीलता बाहेर आणण्यासाठी उपयुक्त ठरली. सुपर कार, लाईन ट्रेसिंग इव्हेंट आदी स्पर्धांमधूनही विद्यार्थ्यांचे कौशल्य दिसून आले. या वेळी डॉ. मंगेश कराड म्हणाले, की पर्सोना फेस्ट विद्यार्थ्यांना विविध कलाक्षेत्रातील कौशल्य सादर करण्यासाठी एक मंच आहे फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी रांगोळी स्पर्धा, इटर्स पॅराडाइज, नृत्य स्पर्धा, गट चर्चा, क्रेझिएस्ट सेल्फी स्पर्धा अशा विविध स्पर्धा झाल्या. तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना विशेष कौशल्य, बुद्धिमत्ता, व्यवहारज्ञान आणि मानवतावाद आदी पैलूंचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली. रॉकेट लॉन्चर, निट्रोबुस्टर यांसारख्या तांत्रिक स्पर्धांमध्येही विद्यार्थी चमकले. (प्रतिनिधी)