शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

"मिशन १५" केवळ चमकोगिरीच; आदर्श रस्त्यांवरील चेंबर खिळखिळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 13:56 IST

- रस्त्यांवरील चेंबर खिळखिळीत

- हिरा सरवदे पुणे : महापालिकेच्या पथ विभागाने मोठा गाजावाजा करत आदर्श रस्ते म्हणून जाहीर केलेल्या ‘मिशन १५’ मधील अनेक रस्त्यांवरील चेंबर अजूनही खड्ड्यांतच असून, जे चेंबर रस्त्याच्या समपातळीत घेतले आहेत, ते खिळखिळीत झाल्याचे चित्र आहे. याशिवाय या रस्त्यावर अद्यापही खोदाईची कामे कमी अधिक प्रमाणात सुरूच आहेत. त्यामुळे हे आदर्श रस्ते केवळ चमकोगिरी असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे.

शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी कमी होऊन वेग वाढावा, यासाठी महापालिकेचा पथ विभाग आणि वाहतूक पोलिसांनी एकत्रित पाहणी करून वाहतुकीला अडथळा ठरणारे गतिरोधक काढून टाकले. पहिल्या टप्प्यात १५ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. ‘मिशन १५’ जवळपास १०० किलोमीटरच्या रस्त्यांवर डांबरीकरण करण्यात आले. काही महत्त्वाच्या चौकांमध्ये थर्मोप्लास्टिक पेंटचा वापर करून डांबरीकरण करण्यात आले. तसेच, रस्त्यांवरील ड्रेनेजच्या चेंबरची झाकणे वरखाली असल्याने वाहनचालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. चेंबरमुळे पडणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघात होतात, तसेच पाठदुखी, कंबरदुखी याचा त्रास देखील नागरिकांना सहन करावा लागत होता, त्यामुळे ड्रेनेजची झाकणे देखील समपातळीत आणल्याचा दावा महापालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला होता.

शहरातील प्रमुख १५ रस्त्यांची नावे जाहीर करत ते दर्श केल्याची टीमकी वाजवत पथ विभागाने आणखी १७ रस्ते आदर्श करण्याचा संकल्प करत त्या रस्त्यांची नावेही जाहीर केली. या पार्श्वभूमीवर लोकमतने काही रस्त्यांची पाहणी केल्यानंतर पथ विभागाचे आदर्श १५ रस्ते केवळ चमकोगिरी असल्याचे समोर आले. या रस्त्यावरील पावसाळी लाइनचे चेंबर अजूनही जैसे थेच असून, साइट पट्ट्या व पदपथाची अवस्था बिकटच आहे. या रस्त्यावरील चेंबर जे रस्त्याच्या समपातळीवर आणल्याचे चित्र दिसते, त्याचे फाऊंडेशन खिळखिळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळते.

 पाहणीत काय दिसले...

- पौड रस्ता.....

पौडफाटा ते वनाज यादरम्यान सिमेंट-काॅंक्रिटच्या रस्त्यावर दोन पट्ट्यांमझ्ये फट निर्माण झाल्याने दुचाकी घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. गुजरात काॅलनी चौकात चेंबरचे झाकण तुटल्याने त्यात लाकूड उभे करून त्यांना झेंड्यासारखे कापड लावले आहे. तसेच, शिवतीर्थनगरच्या कमानीजवळ अजूनही खोदाई दिसते. मोरे विद्यालय चौकात चेंबरवरील जाळीची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. तसेच, मेट्रो स्टेशनच्या खाली साइटपट्ट्या व चेंबर खाली-वर आहे.

- कर्वे रस्ता...

कर्वे रस्त्यावर गरवारे काॅलेज ते खंडुजी बाबा चौक यादरम्यान साइट पट्ट्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. यादरम्यानचे चेंबर रस्त्याच्या समपातळीवर आणण्यात आले आहेत, मात्र त्याचे फाऊंडेशन खिळखिळीत झाले आहे. अनेक चेंबर खचून काही ठिकाणी भगदाड पडल्याचे पाहायला मिळते.

- सिंहगड रस्ता....

सिंहगड रस्त्यावर काशिद चौकाच्या जवळ गेली दोन आठवड्यांपासून एक चेंबर खचलेला आहे. त्यामध्ये माती टाकण्यात आली आहे. काही दिवस येथे लाकूड उभे करून त्याला कापडाचा झेंडा लावला होता, मात्र आता तो गायब झाल्याने अनेक वाहने त्यात आदळतात. तसेच, विठ्ठवाडी येथे हिंगण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लोखंडी चेंबर खिळखिळीत झालेला आहे. राजाराम चौकात मागील खोदाई करून काम झाल्यानंतर रस्ता बुजविण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणी ना डांबरीकरण ना काॅंक्रिटीकरण करण्यात आले. येथील ही परिस्थिती गेल्या तीन आठवड्यांपासून आहे. खोदलेला पट्टा मुख्य चौकात असल्याने वाहने त्यामध्ये आदळतात.

- कोरेगाव पार्क (नाॅर्थ मेन रोड) 

महापालिकेने नाॅर्थ मेन रोड आदर्श केल्याचा दावा केला आहे. मात्र, या रस्त्यावरील चेंबरची अवस्था पूर्वीप्रमाणेच आहे. त्यातच प्रशासनाने हा रस्ता केवळ वेस्टीन हॉटेल चौकापर्यंतच आदर्श मानला आहे. तेथून ताडीगुत्ता चौक व पुढे मुढव्यापर्यंत वाऱ्यावरच सोडल्याचे चित्र आहे. रस्त्यावर जागोजागी खोदाई करण्यात आलेली आहे. साइट पट्ट्यांची व पदपथाची कामे कासवगतीने सुरू आहेत. यामुळे संपूर्ण रस्त्यावर वाहतूककोंडी होते. 

अधिकारी म्हणतात, हे रस्ते आदर्श केले.....

- नगर रस्ता, सोलापूर रस्ता, मगरपट्टा रस्ता, पाषाण रस्ता, बाणेर रस्ता, वेल्सली रस्ता, मंगलदास रस्ता आणि संगवाडी रस्ता, विमानतळ व्हीआयपी रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी रस्ता, नॉर्थ मेन रस्ता, गणेशखिंड रस्ता, छत्रपती शिवाजी-बाजीराव रस्ता.

अतिक्रमणांचा विळखा तसाच...

महापालिकेच्या पथ विभागाने वाहतूक पोलिसांच्या मदतीने १५ रस्ते आदर्श केल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रशासनाने या रस्त्यावरील व पदपथांवरील अतिक्रमणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. या सर्वच रस्त्यांना व पदपथांना आजही अतिक्रमणांचा विळखा कायम आहे. जागोजागी पदपथावरील व्यावसायिकांनी पदपथासह रस्त्यावर आपले साहित्य मांडल्याचे दिसते. त्यामुळे अतिक्रमणे जागेवरच ठेवून हे रस्ते आदर्श कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक