महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग
By Admin | Updated: March 5, 2015 00:27 IST2015-03-05T00:27:38+5:302015-03-05T00:27:38+5:30
वाहतूक नियमन करीत असताना महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग करण्यात आल्याची घटना मार्केट यार्ड येथील वखार महामंडळ चौकामध्ये मंगळवारी दुपारी घडली.

महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग
पुणे : वाहतूक नियमन करीत असताना महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग करण्यात आल्याची घटना मार्केट यार्ड येथील वखार महामंडळ चौकामध्ये मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
विवेक शिवाजी भोसले (वय २६, रा. भैरवनगर, कात्रज) असे अटक तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित निरीक्षक महिलेने फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी भोसलेच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, विनयभंग यासह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच, भोसले याला पकडण्याचा प्रयत्न करीत असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की केली.(प्रतिनिधी)
वाहतूक पोलिसांशी वाद
भोसले हा त्याच्या दुचाकीवरुन दुपारी साडेतीनच्या सुमारास शिवनेरी रस्त्याने जात होता. त्या वेळी त्याला वाहतूक पोलिसांनी अडवले. त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्याचा वाहतूक पोलिसांशी वाद झाला. त्या वेळी त्याने महिला निरीक्षकासोबत हुज्जत घालून अश्लील हावभाव व हातवारे करून त्यांचा विनयभंग केला.