शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

भोसरीमधून हरविलेला ३ वर्षांचा मिराज राजगुरुनगरमध्ये; सोशल मीडियावरून लागला आई-वडिलांचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 2:03 PM

राजगुरुनगरमधील सामाजिक कार्यकर्ते कैलास दुधाळे यांनी पोलिसांना मदत म्हणून त्या मुलाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले. शहरातील माणिक होरे, बापू नगरकर व अनेक सामाजिक संघटना यांनी देखील सोशल मिडीयावर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल केली होती.

राजगुरुनगर (पुणे): राजगुरुनगर बाजारपेठ परिसरात सोमवारी (दि. ११) सायंकाळी  ६:३० वाजता ३ वर्षाचा एक छोटा मुलगा ( मिराज जावेद ) बेवारसपणे  फिरताना आढळून आल्यावर काही अनोळखी व्यक्तींनी त्या छोट्या मुलाला पोलीस ठाण्यात सोडवले. त्या मुलाच्या घरच्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न खेड पोलिसांनी सुरू केला. त्या मुलाच्या घरच्यांचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी शेवटी पोलिस व्हॅनमधे त्या छोट्या मुलाला घेऊन संपूर्ण राजगुरुनगर शहरात व आजुबाजूला त्या मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेण्याच प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी पोलिस व्हॅनवरील स्पिकरच्या माध्यमातून माईकवरुन त्या मुलाविषयी माहिती पुकारत होते. सायंकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत ही शोधमोहिम सुरु होती. मात्र नातेवाईक मिळून आले नाही.

राजगुरुनगरमधील सामाजिक कार्यकर्ते कैलास दुधाळे यांनी पोलिसांना मदत म्हणून त्या मुलाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले. शहरातील माणिक होरे, बापू नगरकर व अनेक सामाजिक संघटना यांनी देखील सोशल मिडीयावर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल केली. फेसबुकवर त्या मुलाविषयी पोस्ट केली. भोसरी पोलीस ठाण्यात वरुन आज मंगळवारी (दि. १२) सकाळी सहायक पोलिस निरिक्षक काशीनाथ बुढे यांचा फोन कैलास दुधाळे यांना आला. फेसबुकवरील पोस्टचा संदर्भ देत सांगितले की, तुम्ही फेसबुकवर जी पोस्ट केलेली आहे त्या मुलाचे आई वडील भोसरी पोलिस स्टेशन येथे मुलगा हरविल्याची नोंद करायला आले आहेत. खेड पोलिस पोलिस हवालदार सागर शिंगाडे यांनी त्या मुलाच्या आई वडीलांना खेड पोलीस स्टेशनला बोलावून घेतले त्या मुलाच्या आईचे नाव रोशन जावेद वडीलांचे नाव महम्मद जावेद रा. भोसरी, भगतवस्ती बाबा आनंद मंगल कार्यालयाजवळ हा मुलगा राजगुरुनगरला कसा आला हे मात्र काहीच समजू शकले नाही.

रितसर कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्या मुलाला त्याच्या आई-वडीलांच्या ताब्यात दिले. मुलाला ताब्यात घेतल्यावर आई वडीलांचा आनंद गगनात मावत नव्हता तर राजगुरुनगरमधे आजही माणुसकी जिवंत आहे असे चित्र दिसून येत होते. या शोध मोहिमेत पोलिस निरिक्षक सतिश गुरव, महिला पोलिस उपनिरिक्षक वर्षा राणी घाटे पोलिस सहाय्यक पोलिस निरिक्षक राहूल लाड, पोलिस हवालदार संतोष घोलप, शेखर भोईर, संदिप भापकर, सागर शिंगाडे वाहनचालक रेफाळे व होमगार्ड सावंत सामील होते.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड