शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मिर्झा गालिब यांच्या प्रतिभेचे चीज झाले नाही : डॉ. सईद तकी आबिदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 20:51 IST

मिर्झा गालिब यांनी दीड हजार उर्दू शेर लिहिले. फारसी शेर १३ हजारांहून अधिक लिहिले...

ठळक मुद्दे ‘गालिब का अंदाज-ए-बयान’ या विषयावर व्याख्यान

पुणे : मिर्झा गालिब यांनी  दीड हजार उर्दू शेर लिहिले. फारसी शेर १३ हजारांहून अधिक लिहिले आहेत. देवदूत, फरिश्ते सुध्दा मानवी जीवनातील मौज, हळूवार भावना समजू शकणार नाहीत; पण गालिब केवळ शायरीतून हळूवारपणे ही मौज, भावना पुढे आणत होते. परंतु, गालिब यांच्या प्रतिभेचे चीज झाले नसल्याची खंत आंतरराष्ट्रीय अभ्यासक डॉ. सईद तकी आबिदी यांनी व्यक्त केली.मिर्झा गालिब यांची २२२व्या जयंतीनिमित्त हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट,रसिक मित्र मंडळ आणि इना फाउंडेशन या संस्थांच्या वतीने आंतरराष्ट्रीय अभ्यासक डॉ. सईद तकी अबिदी यांचे ‘गालिब का अंदाज-ए-बयान’ या विषयावर व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लेन्ग्वेजचे सदस्य डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी आबेदा इनामदार, इना फाउंडेशनचे अध्यक्ष झुबेर शेख, मुनव्वर पिरभॉय, मुमताज पिरभॉय उपस्थित होते.डॉ. आबिदी म्हणाले, मिर्झा गालिब सारखा शायर झाला नाही. खूप कमी मानधनात नोकरी करताना त्यांची घालमेल होत असे. पण, त्यांच्या विपरीत परिस्थितीत मदत करायला कोणी तयार नव्हते. गालिब प्रतिभावान शायर होते, पण, त्यांच्या प्रतिभेचे चीज झाले नाही. तो काळ  इतक्या महान  प्रतिभेला समजून घेण्यास सज्ज नव्हता. अजूनही त्यांचे शेकडो शेरमधील भावना आपण समजून घेण्यास अपुरे पडतो.  काळाच्या पुढचे शब्द लिहिताना ते समकालीन मंडळींना दुखावत नव्हते.दैव दुर्लभ अशी शब्दांची दुनिया त्यांनी उभी केली. त्यांच्या शायरीवर अजून संशोधन व्हायला हवे.   अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ पी ए इनामदार म्हणाले,' यशस्वी हृदयरोग तज्ज्ञ असताना देखील डॉ. अबिदी यांनी ऊर्दू भाषा,कवी यांचा जो अभ्यास केला, त्याची तोड नाही. आमच्या कॅम्पस मधील उर्दू विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळण्यासाठी त्यांच्या अभ्यासाची मदत होईल. डॉ.आबिदी यांच्या लेखनावर पी.एच.डी. करण्यास आम्ही प्रोत्साहन देऊ. 'यावेळी उर्दू शायर  फैज अहमद फैज यांच्यावर  डॉ.आबिदी  लिखित  पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रा, उजमा तस्निम यांनी सूत्र संचालन केले.

टॅग्स :Puneपुणे