शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
4
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
5
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
6
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
7
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
8
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
9
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
10
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
11
Beauty Jha : संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
12
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
13
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
14
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
15
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
16
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
17
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
18
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
19
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
20
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा रिझवणार ‘मिरासदारी’, लघुपटातून उलगडणार दमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:36 IST

गणा मास्तर, हरीनाना, नाना चेंगट, रामा खरात, बाबू पैलवान अशी इरसाल पात्रे द. मा. मिरासदार यांनी आपल्या विनोदी बाजाच्या कथांमधून सशक्तपणे उभी करत रसिकांना रिझवले.

- प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : गणा मास्तर, हरीनाना, नाना चेंगट, रामा खरात, बाबू पैलवान अशी इरसाल पात्रे द. मा. मिरासदार यांनी आपल्या विनोदी बाजाच्या कथांमधून सशक्तपणे उभी करत रसिकांना रिझवले. सहज-सोपी भाषा, छोटे छोटे प्रसंग, ग्रामीण शैलीतील ठसकेबाज संवाद, त्यातून फुलत गेलेल्याकथांचा आणि पात्रांचा निर्माताच आता लघुपटाच्या माध्यमातून पडद्यावर अवतरणार आहे. आज (१४ एप्रिल) वयाची ९१ वर्षे पूर्ण करत असलेल्या दमांसाठी शासनातर्फे विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. त्याच कार्यक्रमात रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दमांचा जीवनपट ‘मिरासदारी’ या लघुपटातून उलगडेल.मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि सादरीकरण यामुळे रसिकांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी केली होती. दमांची ही मुशाफिरी लघुपटाच्या निमित्ताने पडद्यावर आणण्यासाठी त्यांचा नातू रोहन मंकणी याने पुढाकार घेतला आहे.१० मिनिटांच्या लघुपटांमध्ये द. मा. मिरासदार यांचा अकलूजपासून पुण्यापर्यंतचा प्रवास, त्यांचे कथाकथन, आठवणी आदींचा समावेश आहे. त्यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त प्रसाद मिरासदार यांनी लघुपटाच्या पटकथेचे लेखन केले होते. पुढील ११ वर्षांचा प्रवास, त्यांच्याकडून ऐकलेल्या आठवणी यांचा नव्या पटकथेमध्ये समावेश करण्यात आला आहे, त्यातून आताचे ताजेतवाने दमा रसिकांना अनुभवता येतील, अशी माहिती दमांची कन्या सुनेत्रा मंकणी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.द. मा. मिरासदार यांच्या आठवणी, लेखन, कथाकथन, साहित्यिकांच्या, कलाकारांच्या भावना यांचे एकत्रीकरण करून दस्तावेजीकरण करण्यात येत आहे. मंकणी यांच्या स्टुडिओमध्ये दृकश्राव्य एकत्रीकरणाचे काम सुरू आहे, असेही त्या म्हणाल्या.द. मा. मिरासदार यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त द. मा. मिरासदार प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. यानिमित्ताने मिरासदारी महोत्सवाचा प्रारंभ करण्यातआला. कथाकथन स्पर्धा,शाळांना दमांच्या पुस्तकांची भेट, लेखन स्पर्धा, कथांवर आधारित नाटके, नाट्यवाचन, एकांकिका स्पर्धा आदी विविध उपक्रम राबवण्यात आले.अशा उपक्रमांच्या माध्यमातून या वर्षीपासून कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र अशा चार भागांमध्ये मिरासदारी महोत्सव आयोजित करून दरवर्षी मुंबईत समारोप करायचा, अशी आखणी करण्यात आली आहे. शासनाचे अनुदान मिळाल्यास महोत्सव व्यापक करण्याचा मानस आहे.