अल्पवयीन दुचाकीचोर पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: May 12, 2017 05:29 IST2017-05-12T05:29:27+5:302017-05-12T05:29:27+5:30
नामांकित शाळेत दहावीत शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला सिंहगड रस्ता परिसरात रात्रीच्या वेळी दुचाकी, गाड्यांमधील

अल्पवयीन दुचाकीचोर पोलिसांच्या ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नामांकित शाळेत दहावीत शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला सिंहगड रस्ता परिसरात रात्रीच्या वेळी दुचाकी, गाड्यांमधील पेट्रोल चोरीप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले. अट्टल वाहनचोर असलेल्या या मुलाला सीसीटीव्ही फुटेजद्वारे पकडण्यात यश मिळाले. त्याच्याकडून अंदाजे ३ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या १० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.
परिमंडळ २चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे, स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीश सोनवणे, पोलीस कर्मचारी यशवंत ओंबासे, संतोष सावंत, दयानंद तेलंगे पाटील, दत्ता सोनवणे, सुदाम वावरे, राहुल शेडगे, वामन जाधव, हरिश गायकवाड श्रीकांत दगडे या पथकाने कारवाई केली.