लिफ्ट देतो असे सांगून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला भिगवण पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:15 PM2018-02-07T13:15:39+5:302018-02-07T13:16:43+5:30

भिगवण रेल्वे स्टेशन (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत शालेय अल्पवयीन मुलीला लिफ्ट देतो असे सांगून भिगवण-राशीन रोड लगतच्या शेतात नेवून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Minor girl tortured by telling a lift; The accused arrested by Bhigwan police | लिफ्ट देतो असे सांगून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला भिगवण पोलिसांनी केली अटक

लिफ्ट देतो असे सांगून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला भिगवण पोलिसांनी केली अटक

Next

भिगवण : भिगवण रेल्वे स्टेशन (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत शालेय अल्पवयीन मुलीला लिफ्ट देतो असे सांगून भिगवण-राशीन रोड लगतच्या शेतात नेवून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भिगवण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही ती सुरक्षित नसल्याचे समोर येत आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. ४) रोजी राशीन रोडवरील एका शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमावरून पीडित तरुणी परतत असताना आरोपी आदम मेहबूब शेख (वय २६, रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर) याने घरी सोडतो असे सांगून गाडीवर बसवून रोडलगतच्या शेतात नेवून जबरदस्तीने अत्याचार करून याबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या आईच्या फिर्यादीवरुन आरोपीविरोधात बाललैंगिक अत्याचार कायदा २०१२चे कलम ४ व ८, ३०८ (२) ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर करत आहेत.

Web Title: Minor girl tortured by telling a lift; The accused arrested by Bhigwan police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.