अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By Admin | Updated: March 11, 2016 01:42 IST2016-03-11T01:42:38+5:302016-03-11T01:42:38+5:30

येथील एका शाळेतील अल्पवयी विद्यार्थिनीवर बळजबरीने लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी अतुल अशोक शेटीया (रा. रावणगाव, ता. दौंड) याच्यावर गुन्हा दाखल

Minor girl tortured | अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील एका शाळेतील अल्पवयी विद्यार्थिनीवर बळजबरीने लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी अतुल अशोक शेटीया (रा. रावणगाव, ता. दौंड) याच्यावर गुन्हा दाखल
करण्यात आल्याची माहिती पोलीस हवालदार पंडित मांजरे यांनी दिली. दरम्यान अतुल शेटीया हा आरोपी फरार आहे.
येथील एका खासगी गाळ्यात अतुल शेटीया हा किराणा मालाचे दुकान चालवत असून, वारंवार या लहान मुलीला हा त्रास देत असल्याचे समोर आले आहे. मात्र, मंगळवार (दि. ८) रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शाळेची मधलीसुट्टी झाली असताना सदर विद्यार्थिनी घरी जात असताना तिला रस्तामध्ये अडवून अश्लील प्रकार करण्यात आला. मात्र, काही ग्रामस्थांनी पाहिल्यावर आरोपी फरार झाला. याबाबत अधिक तपास बापू मोहिते आणि पंडित मांजरे करीत आहेत.

Web Title: Minor girl tortured