पणदरेत अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार
By Admin | Updated: June 12, 2014 05:25 IST2014-06-12T05:25:42+5:302014-06-12T05:25:42+5:30
पणदरे (ता. बारामती) येथील अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी तरुणाला अटक केली आहे.

पणदरेत अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार
वडगाव निंबाळकर : पणदरे (ता. बारामती) येथील अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी तरुणाला अटक केली आहे. या मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हा प्रकार उघड झाला.
या प्रकरणी आरोपी नितिन लालासो गायकवाड (वय २२, रा. पणदरे, ता. बारामती) यास अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन मतिमंद मुलीचे आई वडिल कामाला गेल्यावर गेल्या काही महिन्यापासून तिचे लैंगिक शोषण झाले.
तिची वैद्यकीय तपासणी केल्यावर ती ७ महिन्याची गर्भवती असल्याचे उघड झाले. तिच्यावर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या मुलीला खाऊचे आमिष दाखवून आरोपी नितिन गायकवाड व त्याच्या साथीदारांनी बलात्कार केल्याचे तक्रार तिच्या आईने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणी गायकवाड याला अटक केली आहे.
त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेतला जात आहे. नितिन गायकवाड याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १८ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ससून रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर खरा प्रकार उघड झाला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार पोळ करीत आहेत. (वार्ताहर)