शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून, पुण्यातील धक्कादायक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 21:39 IST

सिंहगड परिसरातील धक्कादायक घटना, राहत्या घरात घडला प्रकार, आरोपी पसार.

पुणे : घरात एकटीच असल्याचा फायदा घेत सिंहगड परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री उघडकीस आला. शवविच्छेदन अहवालातून तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. 

राहत्या घरात मुलीवर बलात्कारकरून खून झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिका-यांसह परिमंडळ तीनचे उपायुक्त मंगेश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले कुटुंबिय सिंहगड भागातील धायरेश्वर वस्तीत राहतात. संबंधित मुलगी ही परिसरातील एका महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तर तिला एक 13 वर्षांचा भाऊ असून, तो आठवीत शिकतो. तिचे आई-वडिल मोल-मजूरीचे कामे करतात. नेहमीप्रमाणे आई-वडिल गुरुवारी सकाळी कामासाठी घराबाहेर पडले होते. तर भाऊ शाळेत गेला होता. त्यामुळे ती एकटीच घरी होती. तिचा भाऊ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शाळेतून घरी आल्यानंतर त्याने तीला बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेली पाहिली. भावाने तिला आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकदा आवाज देऊनही ती उठत नसल्याने त्याने आई-वडिलांना फोनकरून याबाबत माहिती दिली.

मुलाचा फोन आल्यामुळे आई-वडिलांनी तत्काळ घरी धाव घेतली. यानंतर त्यांनी त्वरीत तिला जवळच्य खाजगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले. दरम्यान, तिचा हात, पाय आणि गळ्यावर जखमा झाल्या आहेत. शवविच्छेदन करण्यात आले असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. बलात्कार करून तिचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. 

सीसीटीव्ही व मोबाइलमध्ये काहीच आढळले नाही : या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांना त्वरीत धाव घेतली. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरात अससेल्या सीसीटीव्हीचे फुटेज जमा केले असून सध्या ते तपासण्यात येत आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या फुटेजमध्ये काहीही मिळून आलेले नाहे. तिचा मोबाइल देखील तपासण्यात आला आहे. मात्र, त्यातून देखील ठोस माहिती समोर आलेली नाही. येथील रहिवाशांकडे चौकशी करून आरोपीचा शोध घेतला जात आहेत. घटना घडलेल्या इमारतीमध्ये बहुंताश कुटुंब हे भाड्याने राहणारे आहेत. येथील अनेक व्यक्ती कामासाठी बाहेर जात असल्याने इमारतीमध्ये दिवसभर कमी वर्दळ असते. 

टॅग्स :PuneपुणेRapeबलात्कारMurderखूनCrime Newsगुन्हेगारी