पाटस : साडे चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. महादेव खंडाळे (वय 50 रा. पाटस ता. दौंड) असे आरोपीचे नाव आहे.
ही घटना शुक्रवार (दि. 28) रोजी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास घडली. पिडीत मुलगी एका टपरीत गोळ्या बिस्कीट घेण्यासाठी गेली असता आरोपीने तिला खाऊचा अमीष दाखवून शेजारी घरी नेले. यावेळी तिच्यावर बलत्कार करण्यात आला. काही वेळाने ही मुलगी आपल्या घरी गेली तेव्हा घडलेली घटना पिडीत मुलीने आईला सांगितली. त्यानंतर तिच्या आईने पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणी दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, यवतचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड तपास करीत आहे.(वार्ताहर)