अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात इसमावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 22:09 IST2018-04-12T22:09:41+5:302018-04-12T22:09:41+5:30
येथून आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचे कशाची तरी फूस लावून अपहरण केल्या प्रकरणी चाकण पोलीस

अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात इसमावर गुन्हा दाखल
चाकण : कुरुळी ( ता.खेड ) येथून आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचे कशाची तरी फूस लावून अपहरण केल्या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात इसमावर आज गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार प्रमोद भोसले यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना बुधवारी ( दि. ११ ) सायंकाळी ७ ते ९ च्या दरम्यान घडली. दीपाली आबासाहेब पाटील ( वय १४, रा. मुऱ्हे वस्ती, कुरुळी, ता.खेड, जि.पुणे, मूळ रा. ब्राम्हणशेवंगे, ता.चाळीसगाव, जि.जळगाव ) असे अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. याबाबत मुलीची आई सुनीता आबासाहेब पाटील ( रा. वरीलप्रमाणे ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५३/२०१८, भादंवि कलम ३६३ नुसार अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत.