शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Pune: कर्वेनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर तोंड दाबून बलात्कार, पीडिता गराेदर राहिल्यानंतर प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 11:10 IST

मागील चार महिने तिला ब्लॅकमेल करत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत गराेदर केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे...

पुणे : कर्वेनगर भागातील ओळखीच्या असलेल्या तरुणाच्या घरी गेलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तोंड दाबून जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर मागील चार महिने तिला ब्लॅकमेल करत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत गराेदर केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी साहील भरत सावंत (रा. लेन नं. १०, घर नं. ४६, रायगड कॉलनी, कर्वेनगर) याच्यावर पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी पीडित मुलीने आराेपी साहील विराेधात तक्रार दाखल केली आहे. सदर मुलगी व आराेपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. कामानिमित्त मुलगी आराेपीच्या घरी गेली हाेती. त्यावेळी आराेपीने तिचे ताेंड दाबून तिच्यासाेबत घरातच जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. त्यानंतर याबाबत काेणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देखील आराेपीने दिली. त्यानंतर मुलगी गराेदर राहिल्याने सदरचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव या करत आहेत.

रिक्षा चालकाकडून तरुणीचा विनयभंग..

कामानिमित्त पुण्यातील खराडी परिसरात राहणारी २३ वर्षीय तरुणी वाघाेली परिसरातील रिलायन्स डिजिटल शाॅप समाेरून एका अनाेळखी रिक्षा चालकासाेबत रिक्षाने जात हाेती. त्यावेळी रिक्षाचालकाने तरुणीची मान पकडून त्याच्याकडे खेचून तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणीने आरडाओरड केला व रिक्षाचालकास जाेरात ढकलून दिले. त्यानंतर तरुणीने रिक्षातून खाली उतरून मदतीसाठी लाेकांना थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु काेणी थांबले नाही, त्यानंतर रिक्षाचालक आराेपीने पुन्हा तिचा हात धरून तिला रिक्षात ओढून नेले व तिचा विनयभंग केला. याप्रकरणी लाेणीकंद पोलिस ठाण्यात अनाेळखी रिक्षाचालकाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग