विमानतळ विस्तारासाठी संरक्षण मंत्रालयाचा हिरवा कंदील : बापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:09 IST2020-12-09T04:09:05+5:302020-12-09T04:09:05+5:30
खासदार गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की लोहगाव विमानतळावर कार्गोसेंटर नाही. त्यासाठी जागाही नाही. ...

विमानतळ विस्तारासाठी संरक्षण मंत्रालयाचा हिरवा कंदील : बापट
खासदार गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की लोहगाव विमानतळावर कार्गोसेंटर नाही. त्यासाठी जागाही नाही. आपल्याला हवाई दलाच्या व प्राधिकरणाच्या अपुऱ्या जागेवर अवलंबून रहावे लागते. चंदिगढ येथील एका इमारतीच्या बदल्यात येथील अडीच एकर जागा विमातळ प्राधिकरणास देण्यास हवाईदलाने हिरवा कंदील दाखविला. चंदिगढ येथील जागा पडून आहे. ती मिळावी, अशी विचारणा हवाई दलाने केली. कारण लडाख लेह या परिसरात जवानांची ने-आण करण्यासाठी. त्यांची उतरण्याची सोय करण्यासाठी ही जागा त्यांना उपयुक्त आहे, अशी माहिती या बैठकीत दिली.
अडीच एकर जागेवर बांधकामास परवानगी द्यावी
बापट म्हणाले, की कोरोनाच्या लसीची पुण्यात सिरम इन्स्टिट्यूतमार्फत मोठ्या प्रमाणात निर्मिती होणार आहे. ही लस देशभरात तसेच परदेशात जलदगतीने पाठविण्यासाठी लोहगाव विमानतळावर खास सुविधा निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी मी भर दिला. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव प्रदीपसिंह खरोळा यांना मी एक निवेदन दिले. भारतीय वायुसेनेच्या अडीच एकर जागेवर बांधकाम करण्यास तातडीने परवानगी द्यावी.