इंदापूर न्यायालयाच्या इमारतीची राज्यमंत्री भरणे यांच्याकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:16 IST2021-09-05T04:16:05+5:302021-09-05T04:16:05+5:30
इंदापूर शहरामध्ये सुरू असलेल्या न्यायालयाच्या इमारतीच्या कामाची पाहणी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी केली. त्यावेळी ते बोलत ...

इंदापूर न्यायालयाच्या इमारतीची राज्यमंत्री भरणे यांच्याकडून पाहणी
इंदापूर शहरामध्ये सुरू असलेल्या न्यायालयाच्या इमारतीच्या कामाची पाहणी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वकील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यात विकासकामांना प्रचंड गती आल्यामुळे तालुक्याचा चेहरामोहरा बदलत आहे. ग्रामीण भागाच्या शहरी भागात अनेक सुविधा निर्माण होत आहेत. याचबरोबर कित्येक वर्षापासून रखडलेले न्यायालयाचे बांधकाम मार्गी लागत असल्यामुळे, तालुक्याच्या वैभवात भर पडणार आहे. ते अत्यंत दर्जेदार व्हावे, आगामी काळात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी या इमारती संदर्भात माझे स्वतःचे लक्ष आहे. इमारत बांधकाम पूर्ण होताना, येथे कोणतेही छोटे - मोठे काम राहू नये. ही माझी इच्छा आहे तालुक्यातील अनेक विधी तज्ञांनी पक्षकारांची गैरसोय होऊ नये, म्हणून त्यांना बसण्यासाठी अद्ययावत शेड उभारणी करावी अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे निधीची चिंता करू नका, तत्काळ लागेल तेवढा निधी उपलब्ध करुन दिला जाईल. अशीही माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी दिली.
--
०४इंदापूर न्यायालय बांधकाम
फोटो ओळ : इंदापूर येथील न्यायालयाच्या इमारतीची पाहणी करताना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व मान्यवर