शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'' मंत्री महोदय '' पुण्यात आणि भाजपा शहराध्यक्ष परगावात..!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 20:25 IST

भाजपा प्रणित सरकारमधील केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर तसेच नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील मंत्री झाल्यानंतर पुण्यात प्रथमच येत आहे..

ठळक मुद्दे नदीसुधार प्रकल्पासंदर्भात सर्व संबधित अधिकारी, पदाधिकारी अशी संयुक्त बैठकही आयोजित

पुणे: भाजपा प्रणित सरकारमधील केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर तसेच नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील मंत्री झाल्यानंतर पुण्यात प्रथमच येत असताना भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष योगेश गोगावले मात्र परगावात आहेत. सुटीचा त्यांचा कार्यक्रम बराच आधी ठरल्यामुळे ते पुण्यात नसल्याचे सांगण्यात आले, मात्र ते नसताना त्यांची जबाबदारी कोणी घ्यायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.जावडेकर पुण्यातलेच आहेत. सलग दुसऱ्यांदा त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले आहे. त्यानंतर प्रथमच ते पुणे दौऱ्यांवर येत आहेत. त्यांनी रविवारी (दि. ९) महापालिकेच्या जायका या नदीसुधार प्रकल्पासंदर्भात सर्व संबधित अधिकारी, पदाधिकारी अशी संयुक्त बैठकही आयोजित केली आहे. रविवारी सकाळी ११ वाजता वनभवन येथे ही बैठक होईल. नवे पालकमंत्री पाटील हेही शनिवारी रात्री पुण्यात मुक्कामी येणार असून रविवारी दिवसभर पुण्यातच थांबणार आहे, त्यांचाही पालकमंत्री म्हणून हा पहिलाच दौरा असेल.असे असताना पक्षाचे शहराध्यक्ष गोगावले पुण्यात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहराचे नवनियुक्त खासदार गिरीश बापट हे दिल्लीत जाऊन दोन दिवसांपुर्वी पुण्यात आले. तीन दिवस ते मतदारसंघातील प्रमुख भागांमध्ये फिरून मतदारांचे आभार मानणार आहेत. तसा कार्यक्रमच त्यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे तेही उपलब्ध नाहीत. मंत्री जावडेकर व मंत्री पाटील यांच्या स्वागताचे काय करायचे असा प्रश्न भाजपाच्या शहर शाखेत त्यामुळे निर्माण झाला आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ तसेच अन्य काही वरिष्ठ पदाधिकारी काम सांभाळत आहेत मात्र अध्यक्षांची अनुपस्थिती चर्चेचा विषय झाली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPrakash Javadekarप्रकाश जावडेकरchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा