माळशेज घाटात मिनीबसला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST2021-02-05T04:59:59+5:302021-02-05T04:59:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मढ : नगरहून कल्याणला जाणारी मिनीबस माळशेज घाटातील प्रसिद्ध असलेल्या आंब्याचा वळसा या ठिकाणाजवळ असलेल्या ...

Minibus accident in Malshej Ghat | माळशेज घाटात मिनीबसला अपघात

माळशेज घाटात मिनीबसला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क

मढ : नगरहून कल्याणला जाणारी मिनीबस माळशेज घाटातील प्रसिद्ध असलेल्या आंब्याचा वळसा या ठिकाणाजवळ असलेल्या रस्त्याच्या कठड्याला धडकली. या अपघातात बसमधील २० ते २५ जण जखमी झाले, तर ४ जण दगावल्याची शक्यता व्यक्त होत आहे. हा अपघात रविवारी रात्री ९ च्या सुमारास झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस प्रवाशांना घेऊन नगर येथून कल्याण येथे जात होती. ही बस माळशेज घाटातील आंब्याचा वळसा येथे आली असता काही अंतरावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कठड्याला जाऊन धडकली. सुदैवाने बस दरीत कोसळली नाही. मात्र, या घटनेत बसमधील २० ते २५ प्रवासी जखमी झाले तर ३ ते ४ जण दगावल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अपघाताची माहिती कळताच टोकावडा (ता. मुरबाड, जि. ठाणे) येथील पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. जखमींना मदत देण्याचे कार्य सुरू आहे. यातील काहींना आळेफाटा येथील रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे.

Web Title: Minibus accident in Malshej Ghat