‘फुगे’च्या शोने जिंकले प्रेक्षकांचे मन
By Admin | Updated: February 23, 2017 03:23 IST2017-02-23T03:23:58+5:302017-02-23T03:23:58+5:30
मैत्री आणि प्रेम यांचा संबंध अधोरेखित करणारा फुगे हा सिनेमा व्हेलेंटाईन डेच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला

‘फुगे’च्या शोने जिंकले प्रेक्षकांचे मन
पुणे : मैत्री आणि प्रेम यांचा संबंध अधोरेखित करणारा फुगे हा सिनेमा व्हेलेंटाईन डेच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. स्वप्निल जोशी, सुबोध भावे, प्रार्थना बेहरे, नीथा शेट्टी अशी तगडी स्टारकास्ट असलेला फुगे स्वप्ना वाघमारे यांनी दिग्दर्शित केला आहे.
लोकमत, जीटीसी पेस्ट कंट्रोल आणि स्टॉकिस्ट किवा इंडस्ट्रीज यांच्यातर्फे कोथरूड सिटी प्राईडला या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन केले होते. पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ व केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ उपस्थित होत्या.
या वेळी प्रमुख कलाकार असलेले स्वप्निल जोशी, सुबोध भावे आदी कलाकार व दिग्दर्शक स्वप्ना वाघमारे उपस्थित होत्या. तसेच, जीटीसी पेस्ट कंट्रोलचे राजेंद्र दिवाकर व स्टॉकिस्टचे किवाचे सुबोध शिरोधकर यांनी कलाकारांचे स्वागत व सत्कार केला. स्वप्निल जोशी यांनी चित्रपटाबद्दल मत व्यक्त करताना सांगितले, की मैत्री व प्रेमाचा बंध उलगडणारा सुंदर प्रवास म्हणजे फुगे. आयुष्यात नात्यांमध्ये अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींमुळे रुसवेफुगवे निर्माण होतात. ते नात्यांपासून दूर न जाता एकत्र येत संवादातून सोडविले गेले पाहिजे. सखी मंचाच्या महिला व प्रेक्षकांनी स्वप्निल जोशी आणि सुबोध भावे या कलाकारांच्या भोवती गराडा घालत सेल्फीही घेतले. तसेच, फुगे चित्रपटील कलाकारांसह चित्रपटाचा आनंद लुटला.