शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
2
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
3
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
4
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
5
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
6
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
7
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
8
कधी काळी सचिन तेंडुलकरची झोप उडवणारा गोलंदाज; आज क्रूझ शिपवर गाणी गाऊन उदरनिर्वाह
9
कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
10
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
11
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
12
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
13
Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
14
Viral Video: "बिहारमध्ये २०-२५ हजारांत मुली मिळतात", कॅबिनेट मंत्र्यांच्या पतीचं वादग्रस्त वक्तव्य
15
Uma Bharti : "लाजिरवाणं, अत्यंत कलंकित; आयुष्याची किंमत २ लाख..."; उमा भारतींचा भाजपाला घरचा आहेर
16
PHOTOS: लग्नाच्या रोमान्सनंतर थेट टेनिस कोर्टवर... ४५ वर्षांची व्हीनस विल्यम्स रचणार इतिहास
17
Rahul Gandhi : "पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
18
मनसेच्या बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर नॉट रिचेबल! खासदाराच्या मुलीविरोधात मैदानात 
19
Thane Municipal Election 2026: ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी
20
८५ वर्षांवरील वयोवृद्धांना यंदा मतदान केंद्रावरच यावे लागणार, केंद्रांवर ज्येष्ठांसाठी सुविधा
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंच्या जनसागराची विजयस्तंभाला मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:44 IST

कोरेगाव भीमा : शौर्याचे प्रतीक असणाऱ्या विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून लाखोंचा जनसमुदाय भीमा कोरेगाव येथे जमला. हातामध्ये निळे झेंडे ...

कोरेगाव भीमा : शौर्याचे प्रतीक असणाऱ्या विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून लाखोंचा जनसमुदाय भीमा कोरेगाव येथे जमला. हातामध्ये निळे झेंडे आणि मुखी जयभीम जयभीमचा जयघोष अशा वातावरणात कोरेगावचा भीमा आजचा दिवस उत्साहात साजरा झाला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यशासनाच्यावतीने मानवंदना दिली. यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, आमदार बापूसाहेब पठारे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन पीपल पार्टीचे जोगेंद्र कावडे, बामसेफचे वामन मेश्राम, भीमराज आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, आदी विविध सामाजिक संघटनांचे नेते विजयस्तंभासमोर नतमस्तक झाले..प्रशासनाने गेले दोन महिने सातत्याने गाव बैठका घेत सामाजिक सलोखा निर्माण केला होता.देश विदेशातूनही मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी समाज विजयस्तंभाजवळ एकवटला होता. 

छत्रपती संभाजीराजेंच्या समाधीस्थळाला अभिवादन -विजयस्तंभास अभिवादन केल्यानंतर वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी लोटले होते. भीमा कोरेगाव ते वढू ब्रुद्रुक येथे जाऊन येण्यासाठी पीएमपीएल बसची व्यवस्था करण्यात आली होती.महार रेजिमेंटची सलामी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९२७ साली विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आल्यानंतर त्यांनी महार रेजिमेंटची स्थापना करण्याची मागणी स्तंभावरूनच केली होती. या घटनेच्या कृतज्ञता म्हणून दरवर्षी १ जानेवारीला विजयस्तंभास महार रेजिमेंटच्या निवृत्त जवानांच्या वतीने मानवंदना दिली जाते. शाहिरी जलशांचा उत्साह या नागरिकांमध्ये उत्साह भरण्याचे काम जागोजागी शाहिरी जलशाच्या माध्यमातून केले जात होते. आंबेडकरी चळवळीची आणि सामाजिक विषमतेवर सडेतोड भाष्य करणारी गीतं याठिकाणी साजरी केली जात होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Lakhs pay homage at Vijay Stambh, Bhima Koregaon witnesses fervor.

Web Summary : Millions gathered at Bhima Koregaon to honor Vijay Stambh. Dignitaries paid respects. Tributes were also paid at Chhatrapati Sambhaji Maharaj's Samadhi. Mahar Regiment offered a salute. Shahiri programs enlivened the atmosphere.
टॅग्स :Puneपुणे