पुणे : चतु:श्रुंगी पोलिसांनी बाणेर बालेवाडी भागामध्ये घरफोड्या करणाऱ्या सुरक्षारक्षकांची नेपाळी टोळी गजाआड केली आहे. त्यांच्याकडून पाच गुन्ह्यांतील ६ किलो चांदी आणि ६५ तोळे सोने हस्तगत करण्यात आल्याची माहिती परिमंडल तीनचे उपायुक्त गणेश शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. गुरू जोशी (नालासोपारा), सागर ख्याती (कामगार नगर, पिंपरी), पद्मबहादूरशाही (खांडेवस्ती भोसरी) जगत शाही (कस्पटे वस्ती, वाकड), जनकशाही (मल्हारनगर, काळेवाडी) आणि काल्याकामी ( बालेवाडी) अशीआरोपींची नावे आहेत. हे सर्व जण मूळचे नेपाळचे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी निरापद दास व एकेंद्र प्रसाद नाथ या सराफांनाही अटक केली आहे. (प्रतिनिधी)
लाखोंचे सोने-चांदी हस्तगत
By admin | Updated: February 23, 2017 04:12 IST