न्हावरे येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:08 IST2021-07-08T04:08:58+5:302021-07-08T04:08:58+5:30

न्हावरे येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून त्यांना संघटनांनी पाठिंबा दर्शविला. यावेळी यशवंतसेनेचे ...

Milking of the image of MLA Gopichand Padalkar at Nhavare | न्हावरे येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक

न्हावरे येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक

न्हावरे येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून त्यांना संघटनांनी पाठिंबा दर्शविला. यावेळी यशवंतसेनेचे प्रांताध्यक्ष रामकृष्ण बिडगर , राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजी कुऱ्हाडे , धुळाशेठ काळे पाटील, प्रशांत थोरात, सतिश तागड, ॲड. रतन बिडगर-पांडुळे, विजय तोंडे, रवींद्र बिडगर, अक्षय इंगळे, रामदास गुलदगड, प्रशांत इंगळे, रामदास शेंडगे, अनिल शेंडगे, राहुल शेंडगे, आत्माराम बिडगर, संतोष बिडगर आदी उपस्थित होते.

यशवंत सेनेचे प्रांताध्यक्ष रामकृष्ण बिडगर म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्षेप असेल तर ते पडळकर यांच्या विरोधात न्यायालयात जाऊन कायदेशीर कारवाई करु शकत होते. परंतु आमदार पडळकर यांच्या प्रतिमेला जे जोडो मारो आंदोलन करण्यात आले ही घटना लोकशाहीला काळिमा फासणारी असून आगामी काळात अशा स्वरूपाच्या घटना कदापिही सहन करून घेतल्या जाणार नाहीत. दरम्यान आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारलेले जोडे आमदार गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला मारले नसून हा जोडा धनगर समाजाच्या अस्मितेला मारलेला जोडा असेही ते म्हणाले.

०७ न्हावरे

न्हावरे येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालताना रामकृष्ण बिडगर व उपस्थित कार्यकर्ते.

Web Title: Milking of the image of MLA Gopichand Padalkar at Nhavare