दूध वाहतूक करणारा टँकर पलटी
By Admin | Updated: October 22, 2015 23:47 IST2015-10-22T23:47:43+5:302015-10-22T23:47:43+5:30
काटेवाडी (ता. बारामती) परिसरातील घुलेवस्ती जवळ समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात दूध वाहतूक करणारा टँकर पलटी झाला आहे. या अपघातात सुदैवाने

दूध वाहतूक करणारा टँकर पलटी
- चालक, क्लीनर बचावले
काटेवाडी : काटेवाडी (ता. बारामती) परिसरातील घुलेवस्ती जवळ समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात दूध वाहतूक करणारा टँकर पलटी झाला आहे. या अपघातात सुदैवाने चालक आणि क्लीनर थोडक्यात बचावले.
माळेगाव येथील नंदन दूध डेअरीकडे दूध वाहतूक करणारा टँकर (क्रमांक एमएच १२/एफए ९५४५) ढेकलवाडी येथून दूध घेऊन निघाला होता. समोरून येणाऱ्या दुचाकी वाहन चालकाला वाचवण्याचा प्रयत्नात रस्त्याचा अंदाज न आलेने रस्त्याचे कडेला शेतात पलटी झाला.
आवाजाने वस्तीतील विशाल व राहुल घुले यांनी अपघात ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी टँकरमध्ये अडकलेले चालक गणेश वाघमारे, नंदन डेअरीचे कर्मचारी भाऊसो लोणकर यांना बाहेर काढण्यास मदत केली. या अपघातातून चालक वाघमारे व लोणकर बालाबाल बचावले. (वार्ताहर)