शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

 दूध उत्पादकाचा जीव टांगणीला : दूध खरेदी दर वाढीची बैठक लांबणीवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 19:57 IST

राज्य शासनाकडून मिळणारे दूध अनुदान मागील तीन महिन्यांपासून बंद आहे...

बारामती : वाढती दुष्काळाची दाहकता दूध व्यावसायाच्या मुळावर आली आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते तसेच  दूध व दुग्धजन्य पदार्थांना मागणीही वाढते. त्यामुळे दुधाचे खरेदी दरही वाढतात. दूध खरेदीदराबाबत खासगी, सहकारी संस्था  व शासन प्रतिनिधींमध्ये होणारी बैठक काही कारणांमुळे लांबणीवर पडली. त्यामुळे दूध खरेदी दर वाढणार का? या चिंतेने दूध उत्पादकाचा जीव टांगणीला लागला आहे. राज्य शासनाकडून मिळणारे दूध अनुदान मागील तीन महिन्यांपासून बंद आहे. ३ एप्रिलला दुधदराबाबत खासगी व सहकारी संस्थांची व राज्य शासन प्रतिनिधींची बैठक होणार होती, अशी माहिती एका खासगी दूध संस्थेच्या संचालकाने दिली. या बैठकीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे लागले होते. मात्र काही कारणांनी ही बैठक झाली नाही. सध्या निवडणुकांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे या प्रश्नाकडे लक्ष द्यायला राज्य शासनास वेळ नसल्याचेही कारण पुढे केले जात आहे.  सध्या बारामती-इंदापूर तालुक्यातील दुग्ध व्यावसायिकांना गायीच्या ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ गुणवत्तेच्या दुधाला २० रूपये दर मिळत आहे. सध्या उन्हाळ्याची दाहकता वाढली आहे. मागील वर्षी पावसाने ओढ दिल्याने बागायती भाग देखील चारा-पाण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे. त्यात ओल्या चाऱ्यामध्ये येणाऱ्या मका व कडवळाचे (ज्वारी) दर गगणाला भिडले आहेत. दूध विक्रीपासून काहीच नफा होत नसल्याने चारा खरेदी करणार कोठून असाही प्रश्न दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर आहे. ओल्या मका १ हजार २०० रूपये प्रतिगुंठा दराने विक्री केला जात आहे. मागील वर्षी  जिरायती भागामध्ये पावसा अभावी ज्वारीच्या पेरण्या अत्यल्प झाल्या होत्या. तसेच काही पिके नंतर पाण्याअभावी जळून गेली. त्यामुळे यंदाच्या वर्षी कडबा पाहायला देखील मिळत नसल्याचे चित्र आहे. तसेच ५० किलो पशूखाद्याची एक गोणी १ हजार २०० रूपयांना मिळत आबे.  सध्या दूधाला २० रूपये दर मिळत आहे. राज्य  शासनाने याआधी प्रतिलिटर ५ रूपये त्यानंतर ३ रूपये असे अनुदान शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली होती. मात्र मागील तीन महिन्यांपासून या अनुदानाची प्रतिक्षा शेतकऱ्यांना आहे. शासनाकडून देण्याते येणारे ३ रूपये प्रतिलिटर अनुदान जरी दूध उत्पादकाला मिळाले तरी दूध व्यावसायातील तोटा भरून निघत नसल्याचे वास्तव आहे. चारा टंचाई, पडलेले दूधाचे दर, वाढता दुष्काळ, घटलेले दूध उत्पादन यामुळे परिसरातील जनावरांच्या बाजारात देखील मंदी निर्माण झाली आहे. जनावरांच्या किंमती ५० टक्क्यांनी घटल्या आहेत. त्यामुळे पशूपालक दुहेरी संकटात सापडला आहे. 

दिवसाकाठी सरासरी १८ लिटर दूध देणाºया एका विदेशी वंशाच्या गायीवर शेतकºयाला चारा, पशूखाद्य, औषधे, मजुरी व इतर खर्च धरता दिवसाला ३५० रूपये खर्च करावा लागतो. त्या गायीचे १८ लिटर दूधाची किंमत सध्याच्या दरानुसार फक्त ३६० रूपये इतकी होते. म्हणजे शेतकºयाच्या हातात एका गायीचे फक्त १० रूपये राहतात. दुष्काळी भागात तर शेतकºयाला फक्त शेणावरच भागवावे लागत असल्याचे वास्तव आहे. 

शासन प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन दूध धंद्याच्या सध्य स्थितीचा अभ्यास करावा. म्हणजे नेमकी परिस्थिती समोर येईल. दूध खरेदी दरामध्ये वाढ करताना ज्यावेळी चर्चा केली जाते. त्यावेळी दोन-चार दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील बोलवावे. फक्त खासगी व सहकारी संस्था चालकांच्या सल्ल्याने दूध खरेदी दर ठरवला जाऊ नये. - तुकाराम देवकाते

टॅग्स :BaramatiबारामतीmilkदूधGovernmentसरकार