शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Milk Association Decision: राज्यात दूध ३ रुपयांनी महागले; शेतक-यांना फायदा अन् ग्राहकांना भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 20:24 IST

दूधव्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाने दूध खरेदी दरामध्ये 3 रुपयांची तर दूध विक्री दरामध्ये 2 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला

पुणे : दूध पावडर व बटरचे वाढलेले दर, वाढती मागणी व कमी उत्पादन, पशुखाद्य, इंधन दरवाढीमुळे शेतक-यांना दूध व्यवसाय करणे शेतक-यांना अडचणीचे ठरत आहे. यामुळेच दूधव्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाने दूध खरेदी दरामध्ये 3 रुपयांची तर दूध विक्री दरामध्ये 2 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या दूध दर वाढीमुळे शेतक-यांना 3 रुपयाचा फायदा तर ग्राहकांना 2 रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. दूध पावडर व बटर यांचे वाढलेले दर त्यामुळे दूधाची वाढती मागणी व कमी उत्पादन यामुळे निर्माण झालेली स्पर्धा त्यामुळे दुधाच्या दरात वाढ झाली. तसेच पशुखाद्य, इंधन दरात झालेली वाढ यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील दुग्ध व्यवसाय करणे अडचणीचे झालेले आहे. या पार्श्वभूमीवर दूध खरेदी विक्रीच्या दराबाबत निर्णय घेण्यासाठी राज्यातील सहकारी व खाजगी दूधव्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाची कात्रज दूध संघ येथे बैठक घेण्यात आली. कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांचे अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी  महानंद, चितळे, गोवर्धन, गोविंद, ऊर्जा, शिवामृत, कात्रज, राजहंस, स्फुर्ती, सोनाई, शिवप्रसाद, नेचर डिलाईट, रिअल डेअरी एस. आर. थोरात, अनंत, संतकृपा, सुयोग इत्यादी सहकारी व खाजगी दूधव्यावसायिकांचे ४७ प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत चर्चा होऊन दूध खरेदी दरात प्रति लिटर 3 रुपयाने वाढ करण्याचा निर्णय घेणेत आला. दूध खरेदी दरात वाढ झाल्याने दूध विक्रीदर वाढविणे क्रमप्राप्त झाल्याने विक्री दरात देखील वाढ करण्याचा विचार झाला. तथापि ग्राहकांवरील दरवाढीचा बोजा कमी व्हावा या हेतुने विक्री दरात प्रति लिटर 2 रुपयाने वाढ करुन विक्री कमिशन कमी करून तसेच खर्चात बचत करुन एक रुपयाचा बोजा डेअरी व्यावसायिकांनी सोसावा असा निर्णय एकमताने घेण्यात आला.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाFarmerशेतकरीMONEYपैसाGovernmentसरकार