इंदापूर : दूधदरात वाढ व्हावी, दूधभुकटीचे बंद केलेले निर्यात अनुदान सुरू करून, किमान 15 टक्के देण्यात यावे, यासह इतर मागण्यांचे ठराव गुरुवारी (दि.27) झालेल्या बैठकीत करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रातील दूध संकलकांची आज इंदापूरमध्ये बैठक झाली. या वेळी शासनाच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या.
4 डिसेंबर रोजी इंदापुरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, नगरपालिकेच्या प्रांगणात दूध ओतून आंदोलक आपल्या भावना व्यक्त करणार आहेत.
तरीदेखील निर्णय न झाल्यास, 8 तारखेपासून ‘सोनाई प्रकल्प’ दूध संकलन करणो बंद करणार असल्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
शासनाचे डोळे उघडले नाही, तर मंत्रलयासमोरही दूध ओतण्याचा इशारा ‘सोनाई’चे दशरथ माने यांनी या वेळी दिला. ते म्हणाले, की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दुधावरील उपपदार्थाचे दर कोसळले आहेत. केंद्रात असलेल्या सरकारने उपपदार्थ निर्यातीसाठी मिळणारे सहा टक्के अनुदान, सत्तेवर आल्यानंतर लगेचच बंद केले. आता कित्येक टन भुकटी, तूप, दूध प्रकल्पांमधील गोदामात पडून आहे. दरात घट आल्याने उत्पादकांना देण्यात येत असणा:या वरकड कमाईत कपात करण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती अशीच राहिली, तर त्यांच्यावर जीवापाड संभाळलेली जनावरे कसायाच्या हाती द्यावी लागतील. तीन वर्षापूर्वी दूधभुकटी निर्यातीला अनुदान दिले होते.
त्यामुळे दूध व्यवसायाला नवसंजीवनी मिळाली होती. प्राप्त परिस्थितीत
बंद केलेले निर्यात अनुदान सुरू
करावे. ते किमान 15 टक्क्यांर्पयत आणावे, असेही या वेळी माने म्हणाले. (वार्ताहर)
दुधाला चांगला
भाव मिळावा
महाराष्ट्रात दररोज 1 कोटी 1क् लाख लिटर दुधाचे संकलन केले जाते. त्यामध्ये ‘सोनाई’च्या 18 लाख लिटर दुधाचा समावेश आहे. ऊस, दुधाला चांगला भाव व शेतीला पाणी पुरेशा प्रमाणात मिळावे, हीच आमची अपेक्षा आहे.