लष्करी जवानाच्या पत्नीची आत्महत्या
By Admin | Updated: June 20, 2017 20:37 IST2017-06-20T20:37:19+5:302017-06-20T20:37:19+5:30
लष्करात औंध हेडक्वॉर्टरमध्ये नोकरीस असलेल्या जवानाच्या पत्नीने सांगवी येथे राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली

लष्करी जवानाच्या पत्नीची आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 20 - लष्करात औंध हेडक्वॉर्टरमध्ये नोकरीस असलेल्या जवानाच्या पत्नीने सांगवी येथे राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली . ही घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. ज्योती प्रकाश महागावकर (वय २२ रा, सांगवी) असे विवाहितेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेचे पती लष्कराच्या औंध हेडक्वार्टर येथे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. ते सकाळी कामावर गेले होते. दुपारी अडीचच्या सुमारास घरी आले असता, घराचा दरवाजा ठोठावला. परंतू दरवाजा उघडला नाही,त्यांना संशय आला. त्यांनी दरवाजा तोडला असता घरात पत्नी पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. महागावकर दांपत्य मूळचे कोल्हापुरचे असून ते सांगवी येथे ते खोली भाड्याने घेऊन राहत होते. पोलिसांना याबाबत माहिती देताच,घटनास्थळी सांगवी पोलीस दाखल झाले . त्यांनी मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रूग्णालयात पाठवला.