शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Kalicharan Maharaj Case: मिलिंद एकबोटे, मोहन शेटे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 20:32 IST

प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात मिलिंद रमाकांत एकबोटे, नंदकिशोर रमाकांत एकबोटे, दीपक बाबूलाल नागपुरे आणि मोहन भालचंद्र शेटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुणे : प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात मिलिंद रमाकांत एकबोटे, नंदकिशोर रमाकांत एकबोटे, दीपक बाबूलाल नागपुरे आणि मोहन भालचंद्र शेटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये चौघांना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सत्र न्यायालयाने सशर्त अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.

या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत किंवा या आदेशापासून पुढील साठ दिवस दर रविवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत किंवा चौकशीसाठी बोलावले जाईल, तेव्हा पोलिस ठाण्यात हजेरी लावावी; तपास यंत्रणांना सहकार्य करावे व पुराव्यात छेडछाड करू नये, या अटींवर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. याच गुन्ह्यात गेल्या आठवड्यात कालिचरण उर्फ अभिजित धनंजय सराग याला जामीन देण्यात आला होता.

समस्त हिंदू आघाडी संघटनेतर्फे १९ डिसेंबर २०२१ रोजी शुक्रवार पेठेतील नातुबाग मैदानावर ' शिवप्रताप दिन अर्थात अफजलखान वधाचा आनंदोत्सव' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जातीय तेढ निर्माण होईल, अशी प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषणे केल्याप्रकरणी कालीचरण, मिलिंद रमाकांत एकबोटे, मोहन शेटे, दीपक बाबूलाल नागपुरे यांच्यावर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एकबोटे बंधू, नागपुरे व शेटे यांनी अ‍ॅड. एस. के. जैन व अ‍ॅड. अमोल डांगे यांच्या मार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCourtन्यायालय