शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी मिलींद एकबोटे शिक्रापूर पोलिसांसमोर हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 15:11 IST

कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी आरोपी असलेले हिंदु एकता आंदोलनाचे प्रमुख व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती प्रमुख व माजी नगरसेवक मिलींद एकबोटे आज (दि. २३) शिक्रापूर पोलीस स्थानकात हजर झाले.

ठळक मुद्देशिक्रापूर पोलीस मिलींद एकबोटे यांची करीत आहेत चौकशीमिलींद एकबोटे स्वत: हून पोलीस ठाण्यात हजर झाल्याची चर्चा

पुणे : कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी आरोपी असलेले हिंदु एकता आंदोलनाचे प्रमुख व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती प्रमुख व माजी नगरसेवक मिलींद एकबोटे आज (दि. २३) शिक्रापूर पोलीस स्थानकात हजर झाले. शिक्रापूर पोलीस त्यांची चौकशी करीत आहेत.

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटेशुक्रवारी दुपारी स्वत: हून पोलीस ठाण्यात हजर झाले. सर्वोच्च न्यालयालयाने त्यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे पोलीस त्यांची चौकशी करू शकणार असतील तरी अटक करू शकणार नाहीत. 

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती़ तेथेही अर्ज फेटाळला गेल्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले़ सर्वोच्च न्यायालयाने ७ फेब्रुवारीला त्यांना अंतरिम जामीन मंजूर करून त्याची सुनावणी २० फेब्रुवारी रोजी ठेवली होती़ मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी अंतिम सुनावणी ४ मार्चला ठेवली असून तोपर्यंत त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्याचबरोबर आतापर्यंत एकबोटे यांना अटक का केली नाही, अशी विचारणा केली होती. या पार्श्वभूमीवर आज एकबोटे स्वत:हून शिक्रापूर पोलीस ठाण्यात हजर झाले. पुणे जिल्हा ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी त्यांची चौकशी केली. आता एकबोटे स्वत: हून पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या एकबोटेंना अटक केली तरी कोर्टाच्या आदेशामुळे लगेचच व्यक्तिगत जातमुचलक्यावर जामीन मिळू शकतो.

टॅग्स :Milind Ekboteमिलिंद एकबोटेBhima-koregaonभीमा-कोरेगावShikrapurशिक्रापूर