मैलामिश्रित पाणी रस्त्यावर

By Admin | Updated: August 21, 2015 02:30 IST2015-08-21T02:30:22+5:302015-08-21T02:30:22+5:30

मांजरी बुद्रुक गोपाळपट्टी येथील मुख्य रस्त्यावर ड्रेनेजलाईनच्या एका चेंबरमधून मैलामिश्रित सांडपाणी काही दिवसांपासून दररोज मुख्य रस्त्यावर वाहत

MILIMISSORED WATER WATER | मैलामिश्रित पाणी रस्त्यावर

मैलामिश्रित पाणी रस्त्यावर

मांजरी : मांजरी बुद्रुक गोपाळपट्टी येथील मुख्य रस्त्यावर ड्रेनेजलाईनच्या एका चेंबरमधून मैलामिश्रित सांडपाणी काही दिवसांपासून दररोज मुख्य रस्त्यावर वाहत असल्याने या परिसरात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथील रहिवासी, दुकानदार व्यावसायिक, प्रवासी तसेच वाहनचालक यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
संबंधित ड्रेनेजलाईन करताना दरडी व गोपाळपट्टी या वस्तीतील अंतर्गत रस्ते व त्यांना जोडणारी पाईपलाईन अत्यंत अरुंद म्हणजे ८ ते १० इंच व्यासाची आहे. हे काम करताना अत्यावश्यक असणारा चढउतार शास्त्रोक्त पद्घतीने नियमित न केल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे, असे नागरिक सांगतात. याचाच अर्थ, भविष्यातील वाढत्या नागरीकरणाचा विचारही न करता निकृष्ट पद्धतीने काम केल्याने नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
हा रस्ता हडपसर, मांजरी, थेऊर, वाघोली या गावांकडे जाणारा असल्याने वाहनचालकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते. याकडे डोळेझाक होत असल्याचा आरोप हडपसर विधानसभा शिवसेना विभागप्रमुख बाळासाहेब घुले यांनी केला.
पाऊस अथवा महापालिकेतील संभाव्य समावेश, अशी कारणे असतील तर संबंधित काम जर नियोजनबद्घ पद्घतीने केले असते, तर पुन्हा नागरिकांच्या कररूपी पैशाचा अपव्यय टाळता आला असता. येत्या १५ दिवसांत ड्रेनेजलाईनच्या समस्येवर तातडीने व कायमस्वरूपी उपाययोजना करावी; अन्यथा तेच मैलामिश्रित सांडपाणी दररोज आपल्या कार्यालयात आणून ओतले जाईल, असे बाळासाहेब घुले यांनी लेखी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना कळविले आहे.
या ड्रेनेजलाईनमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा व दुधाच्या पिशव्या टाकतात. त्यामुळे पाणी पुढे जाण्यासाठी अडथळा ठरतो. हे पाणी चेंबरमधून बाहेर रस्त्यावर येत आहे.
(वार्ताहर)

Web Title: MILIMISSORED WATER WATER

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.