दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मायलेकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:08 IST2021-07-03T04:08:44+5:302021-07-03T04:08:44+5:30

राजेगाव : दौड तालुक्यातील खानवटे येथे दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून नातेवाइकांनी आई आणि मुलास लाथाबुक्क्यांनी जबर ...

Milekas beaten for not paying for alcohol | दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मायलेकास मारहाण

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मायलेकास मारहाण

राजेगाव : दौड तालुक्यातील खानवटे येथे दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून नातेवाइकांनी आई आणि मुलास लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच घरासमोर उभी असलेल्या चारचाकी वाहनांची ही तोडफोड केली.

याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

बापू ऊर्फ इंद्रजित अर्जुन कांबळे, किशोर सुभाष शिंदे, शहाजी शिवाजी गायकवाड (सर्व रा. खानवटे) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी लता प्रकाश जाधव (वय ५५, रा. खानोटा, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. लता जाधव या घराजवळ असलेल्या गुराच्या गोठ्याची साफसफाई करीत होत्या. या वेळी आरोपींनी दारू पिण्यासाठी जाधव यांना पैशाची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे या तिघांनी घरासमोर उभी असलेली त्यांच्या पिकअप मोटारीची तोडफोड केली.

दरम्यान, लता यांचा मुलगा अरुण घराकडे येत असताना त्याच्या कारचेही नुकसान करून त्याला मारहाण दिली. पोलिसांनी या घटनेची दखल घेत तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Milekas beaten for not paying for alcohol