शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

चाकण नगरपरिषद हद्दीतील 130 हेक्टर जमिनीचे भूसंपादन वगळण्याची एमआयडीसीकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 19:18 IST

एमआयडीसीने टप्पा क्रमांक 5 साठी भूसंपादन करण्याची कार्यवाही सुरू केली असून या टप्प्यातील चाकण नगरपरिषदेच्या हद्दीतील १३० हेक्टर जागा मूलभूत सोयी सुविधांसाठी भूसंपदानातून वगळण्याची मागणी नगरपरिषदेने एमआयडीसीकडे केली आहे. 

चाकण : एमआयडीसीने टप्पा क्रमांक 5 साठी भूसंपादन करण्याची कार्यवाही सुरू केली असून या टप्प्यातील चाकण नगरपरिषदेच्या हद्दीतील १३० हेक्टर जागा मूलभूत सोयी सुविधांसाठी भूसंपदानातून वगळण्याची मागणी नगरपरिषदेने एमआयडीसीकडे केली आहे.  चाकण शहराची औद्योगिकीकरणामुळे वेगाने वाढणारी लोकसंख्या व शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर येणारे व स्थायिक होणारे स्थलांतरित नागरिक यामुळे नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मोठी जबाबदारी नगरपरिषदेवर आहे. चाकणच्या आसपास औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने चाकण शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यातच चाकण एमआयडीसीच्या टप्पा क्र. ५ करीता चाकण शहरातील सुमारे १३० हेक्टर जमीन भूसंपादन करण्याची कार्यवाही एम आय डी सी कडून सुरू झाल्यामुळे शहरातील सुविधा निर्मितीसाठी जागेची अडचण निर्माण होणार आहे. सद्यस्थितीत चाकण शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून त्यामध्ये नागरिकांना सुविधा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमीनीची आवश्यकता भासणार आहे. हीच बाब विचारात घेता एमआयडीसीने शहरातील जागा संपादनातून वगळावी, अशी मागणी नगर परिषदेने केली आहे. यासाठी नगरपरिषदेचे प्रयत्न सुरू असून, जमीन भूसंपदानातून वगळावी म्हणून बुधवारी (7 फेब्रुवारी) नगराध्यक्षा मंगलताई गोरे व उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे यांनी याबाबतचे निवेदन / प्रस्ताव एम आय डी सी चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांना दिले. 

टॅग्स :Puneपुणे