पाषाण येथे कोरोना रुग्ण वाढल्याने मायक्रो कंटेन्मेंट झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:16 IST2021-02-23T04:16:45+5:302021-02-23T04:16:45+5:30
दररोज सरासरी ३० ते ३५ हून अधिक रुग्ण औंध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आढळून येत आहेत, यामुळे कोरोना संदर्भातील काळजी घेण्याचे ...

पाषाण येथे कोरोना रुग्ण वाढल्याने मायक्रो कंटेन्मेंट झोन
दररोज सरासरी ३० ते ३५ हून अधिक रुग्ण औंध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आढळून येत आहेत, यामुळे कोरोना संदर्भातील काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी मास्क घातल्याशिवाय बाहेर पडू नये, हात स्वच्छ धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, कोविड १९ संदर्भात केलेल्या नियमांचे पालन करण्यात यावे, आदी सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर औंध क्षेत्रीय कार्यालयामध्ये कंटेन्मेंट झोन नव्हते. मागील काही दिवसांपासून औंध क्षेत्रीय कार्यालयामध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याने सिंध सोसायटी व औंध कोळीवाडा परिसरातील एक लेन मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली.
औंध परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेमध्ये वाढ करणारी ही बाब असली तरी नागरिकांनी घाबरून न जाता बाहेर पडताना सुरक्षेच्या उपाय योजनांचा अवलंब करावा, असे आवाहन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.