शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पुणेकरांसाठी खूशखबर ! म्हाडातर्फे पुणे विभागातील ३१३९ सदनिका व २९ भूखंडांची ३० जूनला सोडत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 18:26 IST

१९ मे पासून अर्जदारांच्या नोंदणीला प्रारंभ ; २० मे पासून नोंदणीकृत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज भरता येणार

मुंबई - पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) पुणे विभागातील विविध वसाहतीतील ३१३९ सदनिका व २९ भूखंडांच्या विक्रीसाठी https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्जदारांच्या नोंदणीला शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. १८ जून रात्री ११.५९ वाजेपर्यंत सदर नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केलेल्या अर्जदारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी २० मे २०१८ रोजी दुपारी २ ते दि. १९ जून २०१८ रोजी रात्री १२ वाजेपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.       

आय. टी. इनक्युबेशन सेंटर, नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे येथे दि. ३० जून २०१८ रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी पुणे मंडळातर्फे   यंदा प्रथमच अर्जदारांना NEFT / RTGS  द्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.  NEFT / RTGS  द्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी  २० मे दुपारी २ वाजेपर्यंत ते १९ जून रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत कालावधी असणार आहे. डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड , इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम  २० मे दुपारी २ ते  २० जून रात्री ११.५९ वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहे.

कोणती कागदपत्रं सादर करावी लागणार?

यंदाच्या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटाकरिताच्या सदनिकांचा समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटाकरिता  ०१/०४/२०१७ ते ३१/०३/२०१८ या कालावधीमध्ये असलेले अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न (पती + पत्नी यांचे एकत्रित उत्पन्न) रु. २५,०००/ पर्यंत असावे. अल्प उत्पन्न गटाकरिता  २५,००१ रुपये ते ५०,००० रुपयांपर्यंत व मध्यम उत्पन्न गटाकरिता ५०,००१ रुपये ते ७५,००० रुपयांपर्यंत तर उच्च उत्पन्न गटाकरिता अर्जदाराचे ७५,००१ रुपये वा त्यापेक्षा जास्त सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम (परतावा) + अर्ज शुल्क (विना परतावा) अत्यल्प उत्पन्न गटाकरिता रु. ५,४४८/- प्रति अर्ज, अल्प उत्पन्न गटाकरिता १०,४४८ रुपये प्रति अर्ज, मध्यम उत्पन्न गटाकरिता १५,४४८ रुपये प्रति अर्ज, उच्च उत्पन्न  गटाकरिता २०,४४८ रुपये प्रति अर्ज आकारली जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन अर्जापोटी प्रतिअर्ज  ४४८ रुपये (विना परतावा) अर्ज शुल्काचा समावेश आहे.

कुठे-कुठे आहेत घरं-जागा?

यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी सेक्टर ५ ए-ब, नांदेड सिटी (सिंहगड रोड, नांदेड गाव, पुणे) व महाळुंगे टप्पा-१ (चाकण-तळेगाव रोड, चाकण एमआयडीसीसमोर, ता. खेड, जि. पुणे) येथील एकूण ४४९ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

अल्प उत्पन्न गटाकरिता  महाळुंगे टप्पा-२ (चाकण-तळेगाव रोड, चाकण एमआयडीसीसमोर, ता. खेड, जि. पुणे) गोपाळपूर (ता. पंढरपूर, जि. सोलापूर), मोरेवाडी (कोल्हापूर), बार्शी (जि. सोलापूर), विजापूर रोड (जि. सोलापूर), तळेगांव दाभाडे (पुणे), सदर बाजार (सातारा), सासवड(ता. पुरंदर, जि. पुणे), दिवे (ता. पुरंदर, जि. पुणे), हडपसर (पुणे), रावेत (पुणे), नांदेड सिटी (सिंहगड रोड, नांदेड गाव, पुणे), चिखली -मोशी (पुणे), पिंपरी (पुणे), चिखली, चऱ्होली बु., कात्रज, धानोरी, आळंदी रोड, वाकड, येवलेवाडी (ता. हवेली, जि. पुणे),मौजे वडमुखवाडी, शिवाजी नगर (सोलापूर), डुडुळगाव  येथील २४०४ सदनिकांचा समावेश आहे.

मध्यम उत्पन्न गटाकरिता सुभाष नगर (कोल्हापूर), सासवड, खराडी, शिवाजीनगर (जि. सोलापूर), विजापूर रोड (जि. सोलापूर), पिंपरी, महाळुंगे टप्पा-१ (चाकण-तळेगाव रोड, चाकण एमआयडीसीसमोर, ता. खेड, जि. पुणे) येथील एकूण २८२ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. तर उच्च उत्पन्न गटाकरिता पिंपरी (पुणे) येथील एकूण ४ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

अल्प उत्पन्न गटाकरिता क्षेत्र माहुली (जि. सातारा) बार्शी (जि. सोलापूर), भोर (जि. पुणे), दहिवडी (ता. माण, जि. सातारा), बनवडी (ता. कराड, जि. सातारा), शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा), अक्कलकोट (जि. सोलापूर),  वाठार निंबाळकर (ता. फलटण, जि. सातारा) येथील भूखंडांचा सोडतीत समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता  बार्शी (जि. सोलापूर), क्षेत्र माहुली (जि. सातारा), दहिवडी (ता. माण, जि. सातारा) तर  उच्च  उत्पन्न गटाकरिता  वाठार निंबाळकर (ता. फलटण, जि. सातारा)  येथील भूखंडांचा सोडतीत समावेश आहे.                   

सदनिकांच्या वितरणासाठी कोणालाही म्हाडाने प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजन्ट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये. तसे केल्यास पुणे मंडळ / म्हाडा कोणत्याही व्यवहारास / फसवणुकीस जबाबदार राहणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

टॅग्स :mhadaम्हाडाPuneपुणे