वाहनांसाठी एमएच १२, एमएच सिरीजला भाव

By Admin | Updated: September 21, 2015 03:48 IST2015-09-21T03:48:47+5:302015-09-21T03:48:47+5:30

दुचाकी, मोटार विकत घेताना आपल्या गाडीला आरटीओकडून मनपसंत नंबर मिळावा, यासाठी अगोदरपासूनच फिल्डिंग लावली जाते

MH 12 for vehicles, price to MH series | वाहनांसाठी एमएच १२, एमएच सिरीजला भाव

वाहनांसाठी एमएच १२, एमएच सिरीजला भाव

पुणे : दुचाकी, मोटार विकत घेताना आपल्या गाडीला आरटीओकडून मनपसंत नंबर मिळावा, यासाठी अगोदरपासूनच फिल्डिंग लावली जाते... चॉइस नंबरसाठी पाहिजे तेवढी रक्कम मोजण्याची तयारी वाहनचालकांकडून ठेवली जाते... त्यातच सध्या पुणे आरटीओकडून ‘एमएच १२, एमएच’ ही सिरीज सुरू झाली आहे, त्यामुळे वाहनांच्या क्रमांकात दोन वेळा एमएच येणार असल्याने हा आकर्षक क्रमांक मिळविण्यासाठी लोकांच्या उड्या पडत आहेत... सर्वाधिक नंबर विकले जाण्याचा विक्रम होण्याची शक्यता असून आरटीओ मात्र मालामाल होत आहे.
चॉइस नंबर घेण्यासाठी वाहनचालकांमधील क्रेझ लक्षात घेऊन ते क्रमांक लिलाव पद्धतीने सर्वाधिक बोली लावणाऱ्याला देण्यास आरटीओने सुरुवात केली आहे. प्रत्येक क्रमांकाची विशिष्ट रक्कम आरटीओने निश्चित केली आहे. तसेच एकच क्रमांक अनेकांनी मागणी केल्यास लिलाव पद्धतीने त्या क्रमांकाचे वाटप केले जाते. या योजनेमुळे आरटीओला कोट्यवधी रूपयांचा महसूल दरवर्षी मिळत आहे.
शहरात दररोज हजारो नवीन वाहनांची विक्री होते. त्या वाहनांना आरटीओकडे सुरू असलेल्या सिरीजनुसार क्रमांक दिले जातात. आरटीओच्या एका सिरीजमध्ये ९ हजार ९९९ क्रमांक असतात.
राज्यातील सर्व वाहनांच्या क्रमांकाची सुरुवात महाराष्ट्राचा सांकेतिक कोड असलेल्या एमएचने होते. त्यानंतर आरटीओचा सिरीज कोड येतो. सध्या दुचाकीकरिता पुणे आरटीओची एमएच ही सिरीज सुरू आहे. त्यामुळे क्रमांकामध्ये दोन वेळा एमएच हा शब्द येणार आहे. हा क्रमांक घेण्यासाठी वाहनचालकांची धडपड सुरू आहे. ही सिरीज दुचाकींची असली तरी नियमानुसार तिप्पट रक्कम भरून चारचाकी वाहनांकरिताही या सिरीजमधील क्रमांक घेतले जात आहेत.
आरटीओने दुचाकीसाठी १, ९,९९,९९९, ७८६ असे व्हीआयपी क्रमांक हवे असल्यास ५० हजार रुपये शुल्क आहे. दुचाकीच्या सिरीजमधील हाच क्रमांक चारचाकी वाहनास हवा असल्यास तिप्पट म्हणजे दीड लाख रुपये शुल्क आरटीओला भरावे लागते. त्यानंतर पुन्हा एकापेक्षा जास्त मागणी आल्यास लिलाव पद्धतीने त्याचे वाटप होते.(प्रतिनिधी)

Web Title: MH 12 for vehicles, price to MH series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.