शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रेडी स्टेडी गो....आणि पिंपरी-चिंचवडला मेट्रो धावली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 21:16 IST

दीड किलोमीटर धावली ट्रेन

ठळक मुद्देमेट्रोची चाचणी पिंपरी-चिंचवडला यशस्वीसुरक्षा विभागाला अहवाल पाठवणारपिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गात पिंपरी-चिंचवड ते दापोडी या भागाला प्राधान्य

पुणे: पिंपरी-चिंचवड येथे शुक्रवारी दुपारी घेण्यात आलेली मेट्रोची चाचणी यशस्वी झाली. संत तुकारामनगर स्थानकापासून पुढे दीड किलोमीटर अंतरावर तीन डब्यांची ट्रेन कोणताही अडथळा न येता धावली. चाचणी घेण्याआधी महामेट्रोनो सर्व सक्षम यंत्रणांकडून परवानगी घेतली होती. आता चाचणीचा अहवाल त्या यंत्रणांना पाठवला जाईल.उन्नत मार्गावर ट्रेन चढवून त्यावर चाचणी घेण्याची ही पहिलीच वेळ होती. ती यशस्वी झाल्यामुळे सर्व तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. नागपूरहून पुण्यात नुकत्याच प्रत्येकी तीन डब्यांच्या दोन ट्रेन आल्या आहेत. त्यापैकी एक ट्रेन शुक्रवारी थेट मार्गावर चालवण्यात आली. संत तुकारामनगर स्थानकापासून पुढे दीड किलोमीटर अंतरावर विद्यूत खांबांची सर्व जोडणी पुर्ण झाल्यामुळे ही चाचणी घेण्यात आली. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गात पिंपरी-चिंचवड ते दापोडी या भागाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचे अंतर ७ किलोमीटर आहे. त्यात एकूण ७ स्थानके असली तरी प्राधान्याने फक्त संत तुकाराम नगर व फुगेवाडी अशी दोन स्थानकेच सुरू करण्यात येणार आहेत. त्यातील संत तुकाराम नगर मार्गावर दीड किलोमीटर अंतरापर्यंत मेट्रो लागणारी वीज पुरवणारे खांब बसवून पुर्ण झाले आहेत. त्यामुळे ही चाचणी घेण्यात आली.मेट्रोला वीज पुरवठ्यासाठी वल्लभनगर येथे स्वतंत्र सबस्टेशन तयार करण्यात आले आहे. तिथून मेट्रोला २४ तास पुरवठा होईल. त्याप्रमाणे आज ही चाचणी घेण्यात आली. महामेट्रोच्या या विभागाचे कार्यकारी संचालक देवेंद्र मिश्रा व त्यांची पुर्ण टिम यावेळी उपस्थित होती. मेट्रो दीड किलोमीटर पुढे व नंतर पुन्हा मागे आणण्यात आली. कोणत्याही अडथळ्याविना ही चाचणी यशस्वी झाली. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी संपुर्ण टीमचे अभिनंदन केले. पुढील मार्गावरचे विद्यूत खांब बसवण्याचे कामही सुरू आहे. येत्या काही दिवसात ते पुर्ण होईल. त्यानंतर या पुर्ण प्राधान्य मार्गावर चाचणी घेतली जाईल असे ते म्हणाले.  पुणे मेट्रोसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट असून आता लवकरच वनाज ते गरवारे महाविद्यालय या प्राधान्य मार्गाचेही काम पुर्ण केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMetroमेट्रो