वनाज ते गरवारे मेट्रो धावणार ऑगस्टअखेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:15 IST2021-02-05T05:15:45+5:302021-02-05T05:15:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावर ऑगस्ट २०२१ अखेर मेट्रो धावणार असल्याची खात्री महामेट्रोच्या ...

Metro to run from Vanaj to Garware by end of August | वनाज ते गरवारे मेट्रो धावणार ऑगस्टअखेर

वनाज ते गरवारे मेट्रो धावणार ऑगस्टअखेर

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावर ऑगस्ट २०२१ अखेर मेट्रो धावणार असल्याची खात्री महामेट्रोच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे व्यक्त केली.

याच मार्गावरचा एसएनडीटी महाविद्यालय ते स्वातंत्र्य चौक दरम्यानचा मेट्रोच्या खांबालगत असलेला पुण्यातील पहिलाच डबल डेकर पूलही जून २०२१ अखेर पुर्ण होणार असल्याचे महामेट्रोच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले. आमदार पाटील यांनी सोमवारी दुपारी महामेट्रोच्या कार्यालयात जाऊन पुणे मेट्रोच्या कामासंबधीची आढावा बैठक घेतली.

महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, आमदार मुक्ताताई टिळक, सिद्धार्थ शिरोळे, पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, संदीप खर्डेकर, पुनित जोशी तसेच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, संचालक अतूल गाडगीळ, विनोद अग्रवाल, हेमंत सोनवणे व मेट्रोचे अन्य अधिकारी बैठकीला उपस्थित होते. दीक्षित व संचालकांनी पाटील यांना मेट्रोच्या सुरू असलेल्या कामाची माहिती दिली.

डिसेंबर २०२१ अखेर मेट्रोचे भूयारी मार्ग वगळता अन्य बहुतेक टप्पे सुरू होतील असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला. कोरोना टाळेबंदीत काम बंद होते. टाळेबंदी उठल्यानंतर कामगार परगावी गेले असल्याने काम सुरू झाले तरीही त्याची गती कमी झाली. त्यामुळे ठरलेल्य मुदतीला विलंब झाला, मात्र आता काहीही अडचण नसून नव्या वेळापत्रकानुसार काम पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले. मेट्रो सुरू झाल्यानंतर तसेच कर्वे रस्त्यावरील डबल डेकर पूल वापरात आल्यावर शहरातील वाहतूकीवर त्याचा चांगला परिणाम दिसेल, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

Web Title: Metro to run from Vanaj to Garware by end of August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.